‘ही’ आहेत शरीरात इम्युनिटी कमी असण्याची लक्षणे, जाणून घ्या सविस्तर…

 

मुंबई | देशभरात कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनापासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर इम्युनिटी वाढवण्याचा सल्ला देत आहे.

इम्युनिटी आपल्या शरीरातील टॉक्सिन्सशी लढण्यास मदत करते. चांगली इम्युनिटी, केवळ सर्दी, खोकल्यापासूनच वाचवत नाही, तर हेपेटायटिस, लंग इन्फेक्शन, किडनी इन्फेक्शनसह अनेक रोगांपासून बचाव करण्यास मदत करते.

इम्युनिटी कमजोर असण्याची अनेक कारणे आहेत. तसेच काही लक्षणेही आहे. आधीपासूनच असलेला एखादा आजार किंवा धुम्रपान, मद्यपानाची सवय, झोप पूर्ण न होणे, खाण्या-पिण्याची चुकीची सवय या काही गोष्टी इम्युनिटी कमी करु शकतात.

शरीरातील इम्युनिटी कमी असण्याची काही लक्षणे आहे ती खाली दिल्या प्रमाणे आहे –

सतत थकवा जाणवणे :-
झोप पूर्ण न होणे, तणाव येणे, एनिमिया अशा कारणांमुळे सतत थकवा जाणवत असतो. हे इम्युनिटी कमी असल्याचे लक्षण असू शकते. तसेच सुस्ती येणे हे पण एक इम्युनिटी कमी असण्याचे कारण असू शकते.

सतत संसर्ग होणे :-
जर तुम्ही सतत आजारी पडत असाल किंवा सतत सर्दी-खोकलाचा त्रास होणे, ताप येणे, घसा खराब होणे किंवा शरीरावर पुरळ किंवा रॅशेस येणे अशा समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागत असेल तर हे इम्युनिटी कमी असण्याचे कारण असू शकते.

व्हिटॅमिन डीची कमी :-
व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात इम्युनिटी वाढवण्याचे काम करत असते. अनेकांमध्ये याची मोठी कमतरता असते. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास ती भरुन काढणे गरजेचे आहे.

तसेच पचन शक्ती कमी असणे ही देखील इम्युनिटी कमी असल्याचे लक्षण असू शकते. दरम्यान, जर शरीरावरील जखम लवकर बरी होत नसेल तर तीही इम्युनिटी कमी असल्याचे कारण असू शकते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.