पावसाळ्यात सर्वजण रोड ट्रिपचे आयोजन करतात आणि ठिकठिकाणी फिरायला जातात. झाडांनी वेढलेले रस्ते, आजुबाजुचे निसर्गसौंदर्य या सर्व गोष्टींमुळे रोड ट्रिपची(Road Trip) मजा आणखीनच वाढतात. पण जर तुम्हाला माहित पडले की तुम्ही ज्या रस्त्यावरून जात आहात, ते रस्ते शापित आहेत किंवा झपाटलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रस्त्यांबद्दल सांगणार आहोत.(These are the scary roads in india)
तामिळनाडूमधील सत्यमंगलम वन्यजीव अभयारण्यातून जाणारा रस्ता अतिशय भयानक आहे. आजही या रस्त्यावरून प्रवास करायला लोक घाबरतात. एकेकाळी या भागात वीरप्पन डाकुचा ताबा होता. पण पोलिसांनी वीरप्पन डाकुला ठार केले. या रस्त्यावर भुताटकीच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. इथे रात्री कंदील हवेत तरंगत असल्याचे सांगितले जाते.
दिल्लीतील सर्वात भीतीदायक ठिकाणांमध्ये कॅन्टचे नाव येते. कॅन्ट रस्त्यावर रात्री पांढऱ्या साडीतील महिला फिरत असल्याचे सांगितले जाते. अनेक वाहन चालकांनी या पांढऱ्या साडीतील महिलेला रस्त्यावरून पळताना पाहिले आहे. ही महिला स्त्याच्या कडेला उभी राहून लोकांकडे लिफ्ट मागते. जे लोक लिफ्ट देत नाहीत त्यांना ही महिला त्रास देण्यास सुरुवात करते.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट हा पछाडलेला भाग मानला जातो. कशेडी घाट हा परिसर निसर्गसौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी नेहमीच येत असतात. पण हे ठिकाण अतिशय भयानक असल्याचे सांगितले जाते. रात्रीच्या वेळी एक महिला कशेडी घाटात वाहन थांबवण्याचा प्रयत्न करते. वाहन चालकाने गाडी न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा अपघात होता, असा लोकांचा समज आहे.
झारखंडची राजधानी रांची आणि जमशेदपूर यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-३३ वर असे अनेक अपघात झाले आहेत, जे असामान्य आहेत. हा महामार्ग अतिशय भयानक असल्याचे सांगितले जाते. या महामार्गावर भूत असल्याच्या अनेक चर्चा ऐकायला मिळतात. हा महामार्ग शापित असल्याचे देखील सांगितले जाते. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला मंदिर असून वाहनचालकाने दोन्ही मंदिरात थांबून प्रार्थना केली नाही तर त्याच्या वाहनाचा अपघात होतो, असा लोकांचा समज आहे.
भानगड किल्ला भारतातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक मानला जातो. दिल्ली-जयपूर महामार्गावर देखील शापित मानला जातो. या रस्त्यावर अनेक भयावह गोष्टींना सामोरे जावे लागते, असा लोकांचा समज आहे. जेव्हा तुम्ही किल्ल्याजवळून जाता तेव्हा तुम्हाला काही नकारात्मक ऊर्जा आणि विचित्र गोष्टी जाणवतात, असे लोकांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘तुझा मोठा भाऊ समजून माफ कर’, गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बॉयफ्रेंडने लिहिले भन्नाट लेटर
राहुल द्रविडची रणनिती फसली? पुन्हा-पुन्हा पिछाडीवर पडतीये टिम इंडिया, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न
‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रुग्णालयात उपचार सुरु