आधारकार्डात नाव, पत्ता व जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ‘ही’ कागदपत्रे; सरकारने बदलले नियम

या काळात आधार कार्ड किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहित आहे. सरकारी कामे असो किंवा वैयक्तिक आधारकार्डचा वापर सगळीकडेच होतो. आता UIDAIने काही नियमांमध्ये बदल केले आहेत. काय आहेत नवीन नियम अटी आणि कागदपत्रे? जाणुन घेऊयात सविस्तर.

आता आधारकार्ड बनविण्याची प्रक्रिया आणखीनच सोपी झाली आहे. UIDAI ने जन्म तारीख, नावातील बदल यासाठी काही नव्या अटी जारी केल्या आहेत. तर, मोबाईल क्रमांक आणि इतर माहितीसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही.

काय आहेत नव्या अटी?

नवीन अटी प्रमाणे जर जन्म तारीख बदलण्याच्या परिस्थितीमध्ये तीन वर्षांहून कमी अंतर असेल तर तुम्ही संबंधित कागदपत्रासह जवळच्या कोणत्याही आधार सुविधा केंद्रावर जाऊन हे बदल करुन घेऊ शकता. तीन वर्षांहून जास्तीचे अंतर कागदपत्रांसह क्षेत्रीय आधार केंद्रात जाणे अपेक्षित असेल. ही आहे नवीन अट.

आता यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे हे जाणुन घेऊयात. जन्म तारखेच्या बदलासाठी जन्माचा दाखला, पॅन कार्ड, पासपोर्ट, लेटर हेटवर ग्रुप-ए गैजेटेड अधिकाऱ्याकडून मिळालेली प्रमाणित तारीख, ओळखपत्र, केंद्र शासनाच्या आरोग्य सेवेतील फोटो कार्ड किंवा माजी सैनिक असल्यास त्यासंबंधीचे ओळखपत्र , इयत्ता दहावी किंवा १२ वीचे प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा आवश्यक आहे.

आता समजा आधार कार्डावर तुमचे नाव चुकीचे छापले गेल्यास आणि तुम्ही त्यात बदल करु इच्छित असल्यास त्यासाठीसुद्धा मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली आहेत.

UIDAI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नावात बदल करण्यासाठी आता केवळ दोनदाच संधी दिली जाणार आहे. यानंतरही नाव चुकीचं आल्यास, ते कार्ड अपात्र ठरवण्यात येणार आहे. ज्यानंतर आधार कार्ड धारकांनी नव्या कार्डासाठी आवेदन करणे आवश्यक असेल.

आणि शेवटची पण महत्त्वाची गोष्ट जर आधार कार्डवरील नावात बदल करण्याचा असेल तर पॅनकार्ड, मतदान कार्ड, वाहन चालनाचा परवाना, शासकीय ओळखपत्र, शिक्षणाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पेंशनसाठीचं ओळखपत्र ही कागदपत्रे लागणार आहेत.

या महत्त्वाच्या कागदपत्रांसह आधार केंद्रावर जाऊन तुम्ही आधार कार्डवर छापण्यात आलेल्या चुकीच्या नावात बदल करु शकता.

असे आहेत नवीन नियम, अटी आणि लागणारे कागदपत्रे आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.