‘या’ प्राण्यांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका! अखेर शास्रज्ञांनी शोधून काढलेच..

न्यूयॉर्क | सध्या जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनमधून पसरलेल्या या व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोना व्हायरस हा वटवाघळामार्फत पसरलेला रोग असून, आता तो माणसांमार्फत माणसांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे. दरम्यान माणसांप्रमाणेच कोरोनाचा धोका काही प्राण्यांनाही आहे.

काही प्राण्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये कुत्रा, मांजर आणि वाघाचाही समावेश आहे. मात्र, आता कोणत्या प्राण्यांना कोरोनाचा किती धोका आहे, हे शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाने केलेल्या अभ्यासानुसार, गोरिला,ओरंगुटन्स, गिबन्स ही माकडे तसेच ग्रे व्हेल आणि बॉटलनोझ डॉल्फिन आणि चीनमध्ये आढळणारा उंदीर यांना कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका माणसांइतकाच आहे.

कोरोना व्हायरस हा मानवी शरीरातील ACE2 या प्रोटिनमार्फत मानवी पेशीत प्रवेश करतो. ACE2 नाक, तोंड, फुफ्फुसातील वेगवेगळ्या पेशी आणि टिश्यूंमध्ये असते.

मानवी पेशीत ACE2 प्रोटिनमधील २५ अमिनो अॅसिड कोरोना व्हायरसला मानवी पेशीत प्रवेश करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.

ज्या प्राण्यांच्या शरीरात ACE2 मध्ये हे मानवी शरीरातील ACE2 तील २५ अमिनो अॅसिड आहे, त्यांना कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. असे संशोधनाचे अभ्यास जोआना डॅमॅस म्हणाले.

त्याचबरोबर, मांजर, गुरेढोरे, मेंढ्या यांना कोरोनाचा मध्यम स्वरूपाचा धोका आहे. तर कुत्रा, घोडा, डुक्कर यांना कोरोनाचा कमी धोका असल्याचे दिसून आल आहे. अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.