Homeखेळ‘या’ पाच मोठ्या चुका ठरल्या भारतासाठी पराभवाची घंटा; जाणून घ्या का झाला...

‘या’ पाच मोठ्या चुका ठरल्या भारतासाठी पराभवाची घंटा; जाणून घ्या का झाला भारताचा पराभव

शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भारताचा सात गडी राखून पराभव करून तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे लक्ष्य होते, ते त्यांनी तीन गडी गमावून पूर्ण केले. त्याच्याकडून कीगन पीटरसनने सर्वाधिक ८२ धावा केल्या.

सेंच्युरियनमधील पहिली कसोटी ११३ धावांनी जिंकून भारताने शानदार सुरुवात केली, पण जोहान्सबर्गमधील दुसरा सामना सात विकेटने गमावला. अशाप्रकारे भारताने सातव्यांदा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका गमावली. आता १९ जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. भारताने मालिका गमावल्याने अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. भारतीय फलंदाजांचे अपयश हे सर्वात मोठे कारण आहे. ही मालिका पराभूत झाल्याची ५ कारणे आपण जाणून घेणार आहोत.

१.पुजारा आणि रहाणे संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरले, त्यामुळे भारतीय संघाला या मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने पहिली कसोटी जिंकली होती, मात्र त्यानंतर दोन्ही सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पुजाराने मालिकेतील ६ डावात केवळ १२४ धावा केल्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सामना नाजूक वळणावर असताना पीटरसनचा झेल सोडला.

याशिवाय रहाणेने खरोखरच निराश केले आहे. रहाणेने ३ कसोटीच्या ६ डावात केवळ १३६ धावा केल्या. रहाणे आणि पुजाराच्या खराब फॉर्मने भारताला पराभवाच्या जवळ आणले आहे. गौतम गंभीरपासून गावस्करपर्यंत या दोघांनाही आता संघात स्थान मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.

२. भारताच्या मालिका पराभवातही अश्विन गोलंदाज म्हणून अपयशी ठरला. विशेषत: शेवटच्या कसोटीत अश्विनकडून खूप आशा होत्या पण त्याच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना कोणतीही अडचण आली नाही.अश्विनला या मालिकेत केवळ ३ विकेट घेता आल्या.

३. तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने ७९ धावा केल्या असल्या, तरी इतक्या मोठ्या खेळाडूकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. कोहलीचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला आहे. कोहलीने या मालिकेत फक्त १६१ धावा केल्या.

४. या कसोटी मालिकेत केएल राहुलने शतक आणि अर्धशतक निश्चितच झळकावले, पण त्यानंतर शेवटच्या कसोटीच्या दोन्ही डावात धावा न करणे भारतासाठी निश्चितच अवघड होते. राहुलने ३ कसोटीत २२६ धावा केल्या, या मालिकेत राहुल आणि पंत यांनाच शतक करता आले. अग्रवालही जागेवर उभा राहू शकला नाही आणि या मालिकेत त्याला केवळ १३५ धावा करता आल्या.

५. कागिसो रबाडाच्या पुढे संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांची दमछाक झाली. रबाडाने २० विकेट घेतल्या. त्याच्यासमोर भारतीय फलंदाजांना दमदार खेळी खेळता आली नाही. कोहली असो की केएल राहुल, रबाडाने सर्व अनुभवी फलंदाजांना धावा करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण केल्या आहे

महत्वाच्या बातम्या-
हृतिकच्या पहिल्या पत्नीच्या अफेअरबाबतचे सत्य आले समोर; प्रियकराने केला धक्कादायक गोष्टींचा खुलासा
कोरोना लसीने केला घात, शेतकऱ्याने गमावला डावा हात, उपचारासाठी लाखो रुपये खर्च
“हा तर दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच”, आमदार रोहित पवार संतापले