Share

काय सांगता? ‘या’ ५ क्रिकेटपटूंनी केली नाही समाजाची पर्वा, केलं थेट घटस्फोटित महिलांशी लग्न

चाहत्यांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच काही जाणून घ्यायचे असते. क्रिकेटपटूही कधीकधी आपल्या निर्णयाने आश्चर्यचकित करून टाकतात. जाणून घ्या कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंनी घटस्फोटित महिलेशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले?(these-5-cricketers-did-not-care-about-the-society-they-got-married-directly-to-divorced-women)

क्रिकेट जेवढे प्रसिद्ध आहे त्यापेक्षा क्रिकेटपटू जास्त प्रसिद्ध आहेत. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे असते. खेळाडूने मैदानात काय केले एवढेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे हे देखील जाणून घ्यायचे असते. कोणताही क्रिकेटर लग्न करतो तेव्हा त्यांचे चाहते आनंदी होतात. काही क्रिकेटर्स असेही होते ज्यांनी समाजाची पर्वा न करता घटस्फोटित महिलेशी लग्न केले. अशाच ५ भारतीय क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊया.

शिखर धवन हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. धवनचे वैयक्तिक आयुष्यही खूप मजेशीर राहिले आहे. २०१२ मध्ये शिखर धवनने आयेशा मुखर्जीसोबत लग्न केले होते. आयशा मूळची मेलबर्नची असली तरी ती ब्रिटिश बंगाली आहे. आयेशाचा आधीच घटस्फोट झाला होता आणि हे नंतर शिखरलाही कळले. शिखर धवन आणि आयशा यांना जोरावर नावाचा मुलगाही आहे. धवन आणि आयशा यांचाही गेल्या वर्षी घटस्फोट झाला.

शमीने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्व फलंदाजांना अडचणीत आणले पण त्याचे वैयक्तिक आयुष्य बरेच वादात सापडले. शमीने २०१४ मध्ये हसीन जहाँशी लग्न केले आणि तिचा घटस्फोट झाला होता. दोघांनाही एक मुलगी आहे. काही काळानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. जहाँने शमीवर अनेक आरोपही केले होते. यावेळी दोघेही एकमेकांसोबत राहत नाहीत.

मुरली विजयने टीम इंडियासाठी कसोटी सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवला. तो टीम इंडियामध्ये स्वत:ला पूर्णपणे स्थापित करू शकला नाही. खेळाव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल खूप चर्चा झाली. मुरली विजयने घटस्फोटित निकिता वंजाराशी लग्न केले. या दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली कारण वंजारा यांनी दिनेश कार्तिकसोबत पहिल्यांदा लग्न केले होते. वंजारा यांनी दिनेश कार्तिकला घटस्फोट देऊन मुरली विजयसोबत लग्न केले.

टीम इंडियाचा प्रसिद्ध लेग स्पिन गोलंदाज अनिल कुंबळेचे क्रिकेटमधील योगदान कोणीही विसरू शकत नाही. त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने खूप नाव कमावले आणि नेहमी फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. अनिक कुंबळेने १९९९ मध्ये चेतनाशी लग्न केले. चेतनाने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि कुंबळेशी लग्न केले. तेव्हापासून कुंबळे आणि चेतना यांचे आयुष्य चांगले चालले आहे.

या यादीत प्रसादचाही समावेश आहे. माजी वेगवान गोलंदाज आणि भारतीय संघाचा दिग्गज वेंकटेश प्रसाद यांनी १९९६ मध्ये जयंती नावाच्या महिलेशी लग्न केले होते. जयंतीचा आधीच घटस्फोट झाला होता. या दोघांची भेट अनिल कुंबळेने केली होती.

महत्त्वाच्या बातम्या
मृत्यूनंतर तब्बल ‘एवढी’ संपत्ती कुटुंबासाठी मागे सोडून गेले यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा, वाचून अवाक व्हाल
मृत्यूनंतर ‘एवढी’ संपत्ती मागे सोडून गेला क्रिकेटपटू सायमंडस; आकडा वाचून डोळे पांढरे होतील
 4 भारतीय क्रिकेटपटूंनी केलंय दोनदा लग्न, 66 वर्षीय दिग्गजाचाही समावेश, वाचून अवाक व्हा
भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूने ६६ व्या वर्षी केले दुसरे लग्न; नवरीचे वय ऐकून धक्का बसेल

खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now