Share

‘या’ पाच अभिनेत्रींंसोबत जोडले गेले होते श्रीसंतचे नाव, पाच नंबरवालीचं नाव वाचाल तर अवाक व्हाल

नुकतेच भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने(S. Shrisanth) क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. एस श्रीसंत २०११ च्या वर्ल्ड कप(World Cup) विजेता संघाचा सदस्य राहिलेला आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत असताना श्रीसंतवर फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याच्यावर ७ वर्षाची बंदी देखील घालण्यात आली होती.(these-5-actress-date-with-s-shrisanth)

२०२० मध्ये एस श्रीसंत क्रिकेटमध्ये(Cricket) परतला होता. एस श्रीसंत आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाकडून सामने खेळला होता. त्याने भारतीय संघाकडून ५३ एकदिवसीय आणि २७ कसोटी सामने खेळला आहे. त्याने कसोटीमध्ये ८७ विकेट्स घेतल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये ७५ विकेट्स घेतल्या आहेत.

एस श्रीसंत नेहमीच वादात राहत होता. भारतीय संघात असताना त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. ‘हेट स्टोरी’ चित्रपटातील अभिनेत्री सुरवीन चावला सोबत देखील एस श्रीसंतचं नाव जोडलं गेलं होतं. २००८ मध्ये एका रिअलिटी शो दरम्यान त्यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये सोबत पाहण्यात आलं होतं. २००९ मध्ये ते वेगळे झाले.

यानंतर २०११ मध्ये एस श्रीसंतच नाव अभिनेत्री रिया सेनशी जोडण्यात आलं. २०११ मध्ये त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. युवराज सिंगसोबत मैत्री खराब होऊ नये यासाठी रिया श्रीसंतपासून दूर गेली होती. पण युवराज सिंगसोबत मैत्री तुटल्यानंतर रियाने पुन्हा श्रीसंतसोबत मैत्री केली. पण रिया आणि श्रीसंतमध्ये पुढं काही झालं नाही.

दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मीसोबत देखील एस श्रीसंतच नाव जोडण्यात आलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघे सोबत दिसायचे. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अभिनेत्री राय लक्ष्मीचे नाव भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत देखील जोडलं गेलं होतं. ‘बचना ऐ हसींनो’ आणि ‘किडनॅप’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री मनीषा लांबासोबत एस श्रीसंतच नाव जोडलं गेलं होतं.

अभिनेत्री सुरवीन चावलासोबत ब्रेकअप झाल्यानंतर एस श्रीसंतची अभिनेत्री मनीषा लांबासोबत मैत्री झाली होती. त्यांना अनेकदा एकत्र पाहण्यात आलं होतं. अखेर त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. यानंतर एस श्रीसंतचं नाव अभिनेत्री श्रेया सरणसोबत जोडण्यात आलं होतं. दोघांच्या लग्नाची चर्चा देखील त्यावेळी होतं होती. पण नंतर अभिनेत्री श्रेया सरण एस श्रीसंतपासून वेगळी झाली.

महत्वाच्या बातम्या :-
‘कौन प्रवीण तांबे?’ चा ट्रेलर झाला प्रदर्शित; श्रेयस तळपदे दिसला नव्या भूमिकेत, पहा व्हिडीओ
PHOTO : राधिकाच्या खऱ्या आयुष्यातील पतीसमोर गुरूनाथही पडेल फिका, वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी
‘खलिस्तानी समर्थकांच्या मदतीने ‘आप’ने पंजाब निवडणुकीत विजय मिळवला’, शीख ऑफ जस्टीसच्या आरोपाने खळबळ

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now