Share

१० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ दोन शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिले छप्परफाड रिटर्न, १ लाखाचे केले ३ कोटी

shear market

शेअर बाजारात(Shear Market) नेहमीच असे काही शेअर्स असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांची कमी वेळात बक्कळ पैसा मिळवून देत असतात. पण अनेकदा परतावा मिळेल किंवा आपलं नुकसान होईल याची शाश्वती शेअर बाजारामध्ये केलेल्या गुंतवणुकीत देता येत नाही. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा असतो.(these 2 shears give huge profit to investor)

आज आपण दोन कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलणार आहोत. या दोन कंपनीचे शेअर्स प्रचंड वेगाने वाढले आहेत. १० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या २ शेअर्सनी जोरदार परतावा दिला आहे. या दोन शेअर्समध्ये पैसे गुंतवणारे लोक खूप श्रीमंत झाले आहेत. अजंता फार्मा आणि नॅटको फार्मा या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

या दोन शेअर्समध्ये ज्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले त्यांना चांगला परतावा मिळाला आहे. शेअर बाजारात या दोन कंपन्यांच्या शेअरची कामगिरी इतकी दमदार राहिली आहे की, एक लाख रुपये गुंतवणारी व्यक्ती आज करोडपती झाली आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना २९,००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

६ मार्च २००९ रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर अजंता फार्माचा शेअर ६.७१ रुपये होता. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स २००८ रुपयांच्या पातळीवर बंद झाला. कंपनीच्या समभागांनी १३ वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना जवळपास २९,००० टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे लोक श्रीमंत झाले आहेत.

जर एखाद्या व्यक्तीने ६मार्च २००९ रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याने ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज त्या व्यक्तीला तब्बल २.९९ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असता. या कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २,४३५ रुपये आहे. त्याच वेळी कंपनीची निच्चांकी पातळी १,६६६ रुपये आहे.

६ मार्च २००९ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर नॅटको फार्माचे शेअर्स ८.८१ रुपयांच्या पातळीवर होते. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स ८८१. १० रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या समभागांनी १३ वर्षांपेक्षा कमी कालावधीत जवळपास १०,००० टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने ६ मार्च २००९ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील तर आजच्या तारखेला त्या व्यक्तीला १ कोटी रुपये परतावा मिळाला असता. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १,१८९ रुपये आहे. त्याच वेळी, निच्चांकी पातळी ७७१.५० रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या :-
गुगलमध्ये शोधल्या चुका आणि किराणा दुकानदाराचा मुलगा झाला करोडपती, कंपनीने दिले तब्बल एवढे कोटी
वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरील हक्कांसाठी ‘वारस नोंदणी’ कशी करतात? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया
किराणा दुकानदाराच्या मुलाने गुगलमध्ये शोधल्या ३०० चुका, मिळाले तब्बल ६५ कोटींचे बक्षिस

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now