त्यादिवशी सुशांतच्या घरात पार्टी झालीच नाही; शेजारच्या महिलेने सांगितला ‘त्या’ रात्रीचा किस्सा..

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या या निर्णयामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

परंतु, सुशांतने हा टोकाचा निर्णय का घेतला?, सुशांतला कोणत्या गोष्टीचा त्रास होत होता? सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा सीबीआय प्रयत्न करत आहेत.

सुशांत केसमध्ये दररोज नव्याने धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आता तर सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने मोठा खुलासा केला आहे.

या महिलेने असा दावा केला आहे की, १३ जूनच्या रात्री सुशांतच्या फ्लॅटमध्ये कोणत्याही प्रकारची पार्टी झाली नाही. त्या रात्री सुशांतच्या घराची लाईट बंद होती, पण किचनची लाईट मात्र सुरु होती. या महिलेने स्वत: मीडियासमोर येऊन ही मोठी माहिती दिली आहे.

पुढे त्यांनी असेही सांगितले की सुशांतच्या फ्लॅटमधील लाईट्स इतरवेळी रात्री उशिरापर्यंत सुरू असायची. तसेच त्या रात्री सुशांतच्या घरात कोणतीही पार्टी झाली नाही, असेही या महिलेने सांगितले आहे.

या महिलेने ही मोठी माहिती दिल्यामुळे सीबीआय याप्रकरणी या महिलेची आणखी चौकशी करत आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल (२२ ऑगस्ट) दुपारी २.२५ वाजता सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली होती. सीबीआयच्या टीम सुशांतच्या घरी डमी चाचणीचा उपक्रम राबवनार आहे. यासाठी सीबीआयने सर्व सामानही सोबत आणलं आहे.

हा उपक्रम चालू असताना सीबीआयने मुंबई पोलिसांच्या टीमला घरात प्रवेश दिला नसून, त्यांना  बाहेर उभे राहण्यास सांगिले आहे. अशी माहिती मिळाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.