गुजरातमधील डांग जिल्ह्याला चांगला पाऊस होऊनही जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. डोंगराळ आणि खडकाळ भूभागामुळे पावसाचे सर्व पाणी समुद्रात जाते. अशा स्थितीत येथील नागरिकांना दैनंदिन वापरासाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे.(Well, Gujarat, rain, farmers, water, agriculture)
गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याचे भीषण संकट आहे. येथील अनेक जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस पडतो, मात्र डोंगराळ व खडकाळ भाग असल्याने पावसाचे पाणी थांबत नाही. डांग जिल्ह्यात दर पावसाळ्यात सुमारे १२५ इंच पावसाची नोंद होते, मात्र डोंगराळ आणि खडकाळ भागामुळे पावसाचे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते.
एवढा पाऊस होऊनही येथील नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. दैनंदिन वापरासाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठीही त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. येथील बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अश्यात पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकले आहे.
वसुराणा गावातील ६० वर्षीय शेतकरी गंगाभाई पवार हे २० वर्षांपासून गावातील सरपंचाकडे विहिरीसाठी मदत मागत होते. मात्र, त्यांच्या सरपंचाकडून प्रशासनाकडून त्यांना कोणतीही मदत करण्यात आली नाही. यानंतर गंगाभाई यांनी स्वतः विहीर खोदण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा विहीर खोदल्यावर दगड निघाले.
दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्यांदाही पाण्याऐवजी दगड सापडले, पण हार न मानता गंगाभाईंनी पाचवी विहीर खोदण्यास सुरुवात केली, रात्रंदिवस २ वर्षाच्या मेहनतीनंतर ,अखेर पाचव्या विहिरीत ३२ फूट खोलीवर पाणी आले. गावाच्या सरपंच गीताबेन गावित यांनी गंगाभाई यांच्या मेहनतीचे कौतुक केले व अभिनंदन केले.
गावातील अर्जुन बागुल म्हणाले की, ही विहीर केवळ गंगाभाईचीच नव्हे तर संपूर्ण गावाची तहान भागवेल. आता या शेतकरी गंगाभाई यांनी आपल्या मेहनतीने विहीर खोदून पाणी काढल्याले आहे. पण ह्या कच्च्याला पक्का करण्यासाठी पैशांची गरज निर्माण झाली असून, सरकार ही मागणी पूर्ण करते की नाही हे पाहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
देशात खळबळ! एकाच ट्रकमध्ये आढळले तब्बल 46 मृतदेह, चौकशीत झाला हैराण करणारा खुलासा
राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू, शिवसैनिक झाले आक्रमक
येत्या चोवीस दिवसांत शिंदे आणि ठाकरे गटापुढे कोणते पर्याय? वाचा कायदा काय सांगतो…