नियम पायदळी तुडवून हळदीचा कार्यक्रम होता सुरू; कार्यक्रमात वाद झाला अन् पाहूण्यांना धू धू धुतलं

विरार | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. लग्न समारंभ, अंत्यसंस्कार कमी लोकांच्या उपस्थित  नियम पाळून करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी नियमांना पायदळी तुटवले जात आहे.

लग्न समारंंभ अनेक जण धूमधडाक्यात करत आहेत. बॅन्जो, डिजेच्या तालावर वराती निघत आहेत. लग्नात वादावादीच्या घटना घटत आहेत. विरारच्या सकवार गावात एक लग्नातील भांडणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

गावातील सुनील तांबोळी यांचा विवाह सोहळा होता. याविवाह सोहळ्याच्या आधी हळदीच्या कार्यक्रमात लोकांनी तसेच पाहूण्यांनी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरू असताच यांच्यामध्ये वाद झाला आणि वादात एकमेकांना लाथ बूक्क्यांनी चोप देण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकतो, भर मंडपातच तरूण एकमेकांना चोप देत आहेत. या कार्यक्रमात कोरोना नियम पायदळी तुडवले आहेत. कुणाच्याही तोंडाला मास्क लावलेला दिसत नाही. कार्यक्रमात लोकांची संख्याही जास्त आहे.

राज्य सरकारने विवाह सोहळा साध्या पध्दतीने २५ लोकांच्या उपस्थित फक्त २ तासात उरकण्याचे आदेश दिला आहे. मात्र तरीही खेड्यापाड्यात विवाह सोहळ्यांना मोठ्या प्रमावर गर्दी होत असते. यामुळे कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे.

सोशल मिडियावर हळदीच्या कार्यक्रमातील वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गावातील सरपंच, पोलिस पाटील यांना या कार्यक्रमाची माहिती होती का नव्हती. असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. प्रशासन आता यावर काय कारवाई करतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार, राज्यात गेल्या २४ तासात ३ लाख ११ हजार १७० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४,०७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३ लाख ६२ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
विवाहित असताना देखील अभिनेत्रींच्या प्रेमात पागल झाले होते ‘हे’ अभिनेते
रियल सिंघमने उडवली दौंडमधील काळे धंदेवाल्यांची झोप! सर्व धंदे बंद करत केला साडेचार कोटींचा माल जप्त
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडच ‘लॉकडाऊन लग्न’, म्हणतेय ही तर नवीन सुरवात..
एक कोटी झाडांपासून ऑक्सिजन मिळवून देणारा ट्री मॅन, पुर्ण जग त्यांना ठोकतंय सलाम

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.