100 दिवसात ‘या’ देशामध्ये एकही कोरोना रूग्ण नाही; महिला पंतप्रधानावर कौतुकाचा वर्षाव

वेलिंग्टन । जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अमेरिका, चीन आणि रशियासारख्या देशांनी देखील या व्हायरससमोर लोळण घेतली आहे. मात्र न्यूझीलंड या देशाने यादरम्यान कमाल करून दाखवली आहे.

मागील 100 दिवसात एकही कोरोना रूग्ण आढळून न आल्याने आता न्युझीलंडवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांच्या नेतृत्वामुळे कोरोनावर मात करणे शक्य झाल्याचे आता बोलले जात आहे.

जॅसिंडा यांनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कडक लाॅकडाऊनचे आदेश लागू केले होते. यावेळेस देशातील कोरोना बाधीतांचा आकडा केवळ 100 इतका होता.

या कडक लाॅकडाऊनचा परिणाम म्हणजे मागील 3 महिन्यांच्या काळात एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र परदेशातून आलेल्या नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे निष्पन्न होताच त्यांना सीमेवरच क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला.

उत्तम राजकीय नेतृत्व मिळाल्याने आणि त्याला विज्ञानाची उत्तम जोड दिल्याने न्युझीलंडला कोरोनावर मात करता आली. असे मत युनिवर्सिटी ऑफ ओटॅगो येथील प्रोफेसर माइकल बेकर यांनी व्यक्त केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.