…तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले लॉकडाऊनचे संकेत

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. तर दुसरीकडे करोना रुग्णांच्या मृत्यू संख्याही वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रणासाठी मर्यादित काळासाठी राज्यात टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध त्वरित लावण्याचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

तसेच रविवारी झालेल्या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘कोरोना रुग्णसंख्या वाढत राहणे म्हणजे आपण लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करतोय असे म्हणावे लागेल,’ असे त्यांनी म्हंटले.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘लोकांनी कोरोना विषयक नियम पाळले नाहीतर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही.’ राज्यात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.

यावेळी टोपे यांनी सांगितलं की, ‘आयसीएमआर’च्या नियमाप्रमाणे १५ दिवसांचा लॉकडाऊन कोरोनाची पूर्ण साखळी तोडण्यासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती झाल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे. अगदी १० ते १८ वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

‘…तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा’
राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, मास्क याचे पालन होताना दिसत नाही.’

तसेच पुढे ते म्हणाले, ‘लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला  आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या 

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर संपूर्ण देशात हिंसाचाराच्या घटना

आपला संसार अपूर्ण राहीला, पुढच्या जन्मी नव्याने सुरवात करू; माझी हार्डडिस्क फुटत आहे मला माफ कर

‘…तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा’, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.