महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही, ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध!

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा कहर निर्माण झाला असून परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला असून राज्यात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नाही.

मात्र ३० एप्रिलपर्यंत काही कडक निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असून या बैठकीनंतर सविस्तर माहिती समोर येणार आहे.

लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत. हे नियम काय असतील त्याबाबत गाईडलाईन्स आजच घोषित होण्याची शक्यता आहे. मात्र लॉकडाऊन होणार नाही हे मात्र निश्चित झाले आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून समाजातील विविध घटकांशी संवाद साधला आहे.

जीम मालक, हॉटेल व्यावसायिक, पत्रकार, संपादक, उद्योजक आणि फिल्मी जगतातील मान्यवरांशीही त्यांनी चर्चा केली आहे. त्यातून त्यांना अनेक सूचना आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी या सर्व घटकांना कोरोनाची परिस्थिती आणि त्याचं गांभीर्यही समजून सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज काय निर्णय घेतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज यांना फोन; म्हणाले…
एकीकडे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागल्याने, काहीतरी ठोस निर्णय घेण्याच्या उद्देशाने आज मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर संपर्क साधून सहकार्य करावे, असे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“जगात कोरोना नाही, त्यामुळे मी ही आता मास्क काढला आहे! जयंत पाटलांचे धक्कादायक विधान

…तर लॉकडाऊन लावावा लागेल; अजित पवारांनी दिला सूचक इशारा

शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नात तुफान गर्दी; कोरोना नियमांचे उल्लंघन, तोंडावर मास्क पण नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.