माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदे आता राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. अनेक आव्हान पार करत अखेर ठाकरे सरकारला खिंडार पाडून शिंदे हे भाजपसोबत हात मिळवणी करून सत्तेत आले आहेत. मात्र शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेत मोठी पडली असल्याच पाहायला मिळत आहे.
शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्विकरून आठ दिसून ओलांडून गेले आहेत. मात्र अद्याप उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली नाहीये. यावरून लक्षात येते की, शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये काही आलबेल नाहीये. यासर्व नाट्यमय घडामोडींवर अखेर शिंदे बोलले आहेत.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर तुम्ही जाल का?, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी शिंदे यांना विचारला. यावर उत्तर देताना शिंदे यांनी अगदी मोजक्याच शब्दात स्पष्टीकरण दिलं आहे.
याबाबत बोलताना शिंदे यांनी म्हंटलं आहे की, ‘ज्या पद्धतीने ते आमच्यावर आरोप करताहेत, आमच्यावर टीका करताहेत, आम्हाला गटनेते पदावरून काढून टाकलंय, आमचे पुतळे जाळताहेत. मला नाही वाटत त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत, असं शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं.
दरम्यान, पुढे बोलताना शिंदे यांनी बाळासाहेबांच्या एका विधानाची आठवण करून दिली. याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही आणि तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेल, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, असं शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
याचबरोबर जळगावच्या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील आघाडी सरकारमुळे राज्याची १५ वर्षे सडली. मग अशावेळी आम्ही किती दिवस तुमच्याबरोबर बसणार होतो, असा थेट सवाल एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला केला आहे. याचबरोबर विधान परिषदेत आम्ही दोघांनाही निवडून आणले, पक्षाशी गद्दारी केली नाही, असही शिंदे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
‘मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत’; महिला शिवसैनिकांचा बंडखोर आमदारांना इशारा
‘नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल त्याला मी माझं घर देईल’, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दर्ग्याच्या खादिमला अटक
‘मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत’, महिला शिवसैनिक बंडखोरांविरोधात आक्रमक
मुले खायला मागतील म्हणून झोपूनच ठेवतात पालक, महागाईमुळे ‘या’ देशात बिकट परिस्थिती