Congress : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षामध्ये महाराष्ट्राच्या राज्यसंघटनेत बदल होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
राष्ट्रीय पातळीप्रमाणेच आता काँग्रेसमध्ये राज्यसंघटनेत फेरबदल होणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये १९ सप्टेंबरला बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाकरीता कुणाकुणाची नावे चर्चेत आहेत, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील व माजी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार या नावांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार मानले जात आहे. तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रीय पातळीवर पक्षाअंतर्गत निवडणूक घेण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.
नवे अध्यक्ष निवडल्यानंतर काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १९ सप्टेंबरला मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाच्या दावेदाराचे नाव निश्चित करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर काँग्रेसच्या काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्येही फेरबदल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या बैठकीत सर्वानुमते काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचे नाव ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रदेशाध्यक्ष पदासाठीचा प्रस्ताव दिल्लीतील काँग्रेस हायकमांडकडे पाठवल्यानंतर महाराष्ट्राला नवे प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
यशोमती ठाकूर या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अमरावतीच्या पालकमंत्री होत्या. तसेच सुनील केदार यांच्याकडे विदर्भातील काँग्रेसचा चेहरा तर सतेज पाटील यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा चेहरा म्हणून पाहण्यात येते. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी यशोमती ठाकूर, सुनील केदार आणि सतेज पाटील या तीनपैकी कोणत्या नावाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
भारत जोडो यात्रेसाठी वर्गणी दिली नाही म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजीवाल्याचं सामान फेकलं
Cheetah : २५० दरोडे आणि ७० खून करणारा डाकू बनला ’चित्ता मित्र’; उचलला चित्त्यांच्या सुरक्षेचा विडा
Narendra Modi : “पंतप्रधान मोदींना त्यांचे मित्र गौतम अदानींना जगात पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत बनवायचे आहे”
Narendra Modi: सगळा देश मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय पण चर्चा मात्र शिंदेंच्या शुभेच्छांचीच; कारण…