श्रीराम लागूंच्या मुलाच्या निधनामागे आहे खूपच धक्कादायक कारण; आजही दुःख विसरणं कठीण

मुंबई। मराठी चित्रपटसृष्टीतील नटसम्राट म्हणजेच अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे डिसेंबर, २०१९ला यांचं वृद्धपकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. 1950 च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात पाच वर्षे काम केले .

नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. 1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी 1969 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली.

कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. लागू यांना फिल्मफेअर पुरस्कार, कालिदास सन्मान, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, राजश्री शाहू कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागू यादेखील रंगभूमीवरील जाणत्या कलाकार. त्यांना तन्वीर नावाचा मुलगा होता. तन्वीरचा ९ डिसेंबर १९७१ साली जन्म झाला. कामानिमित्त तो पुणे मुंबई मार्गे रेल्वेने प्रवास करत होता. श्रीराम लागू व पत्नी दीपा लागू यांना एक तन्वीर नावाचा मुलगा होता.

तन्वीर कामानिमित्त पुणे मुंबई मार्गे रेल्वेने प्रवास करत होता. खिडकी शेजारी बसून पुस्तक वाचत असताना बाहेरून कोणीतरी फेकलेला दगड थेट त्याच्या डोक्याला लागला. त्यामुळे जोरदार आघात होऊन तन्वीर कोमामध्ये गेला. मात्र अनेक उपाय उपचार करूनही त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूनं लागू दाम्पत्य पूर्णपणे कोलमडून गेलं. ९ डिसेंबर रोजी तन्वीरचा वाढदिवस असतो या निम्मित तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार नावाने जेष्ठ नाट्यकर्मींना त्यांच्या विशेष योगदानासाठी पुरस्कृत केले जाते. यातून भारतभरातील रंगभूमीवरील कलाकारांना त्यांच्या रूपवेध या संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ‘रूपवेध’ तसेच ‘लमाण’ हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘ओ नारी मनहारी, सुकुमारी…’ प्रिया बापटचा मनमोहक रील व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकुळ
किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा ठोकणार; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे हसन मुश्रीफ संतापले
ठाकरे सरकारच्या डर्टी ११ मध्ये मंत्री हसन मुश्रीफही, १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप 
गणेशाच्या प्रसादासाठी बनवलेले लाडू खाण्याचे फायदे काय?; वाचा आहारतज्ज्ञ काय सांगतात..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.