काय सांगता! चोराच्या घरावरच डल्ला, ८ कोटीचे समान चोरी होऊनही तक्रार नाही

नवी दिल्ली । चोरट्याच्या घरी चोरी झालेली तुम्ही कधी ऐकला का?, नाही ना, मात्र अशीच एक घटना आता समोर आली आहे.चोरांकडून ६.५५ कोटीचे सोन्याचे दागिने, सव्वा आठ कोटीचे सामान आणि ५७ लाख रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी ६ चोरट्यांना पकडले आहे.

नोएडा सेक्टर ३९ मधील ही घटना आहे. पोलिसांना अशी माहिती मिळाली, की काही संशयित सदरपुर सोम बाजाराजवळ उभा आहेत. त्यांच्याकडे करोडो रुपयांचे सोने आहे. पोलिसांनी तात्काळ याठिकाणी धाव घेत राजन भाटी आणि अरुण नावाच्या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून १-१ किलो सोन्याचे बिस्कीट आणि कॅश जप्त केला. चौकशीत त्यांनी आपल्या इतर सहा साथीदारांच्या नावाचाही खुलासा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ चोरांनी २३ सप्टेंबर २०२० ला सूरजपुरच्या सिल्वर सिटी सोसायटीमधील एका फ्लॅटमधून करोडो रुपयांचे सोने आणि रोकड चोरी केली होती. मात्र, दोन चोरांना पकडण्यात आल्यानंतर त्यांनी खुलासा केला असता पोलिसांनी सेक्टर ८१ मधून जय सिंह, नीरज, अनिल आणि बिंटू शर्मा यांना अटक केली आहे. या सर्व चोरांकडून पोलिसांनी १३. ९ किलो सोने, १ कोटी १० लाख किमतीचे जमिनीचे कागदपत्र, ५७ लाख रुपये कॅश जप्त केला.

या सोन्याची किंमत बाजारात ६.५५ करोड असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे ८.२५ करोड रुपयांचे सामान जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सामानाच्या वाटण्यांवरुन चोरांमध्ये भांडण झाले. यानंतर त्यांच्यातीलच एकाने पोलिसांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली.

पोलिसांने असे सांगितले, की चोरांनी ज्याच्या घरावर दरोडा टाकला, त्या व्यक्तीच्या नावावरही अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. चौकशीनंतर त्या व्यक्तीलाही आरोपी घोषित करण्यात येईल. आरोपी स्वतः वकील असल्याचे सांगतो. पोलिसांचे म्हणणे आहे, की घरातून करोडोची चोरी होऊनही त्याने याची तक्रार केली नाही, कारण त्याच्या नावावरही अनेक तक्रारी आहेत, त्यामुळे त्याने तक्रार केली नाही.

ताज्या बातम्या

मुस्लिमांनी वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले, तरच सामाजिक समस्यांवर तोडगा निघेल- मुख्यमंत्री हिमंता बिस्वा

पाणी प्यायला गेलेल्या हत्तीमध्ये आणि मगरीमध्ये जुंपली, पहा थरारक भांडणाचा व्हिडिओ

साजिद खानच्या या वाईट सवयीला कंटाळून जॅकलिनने केले होते ब्रेकअप, स्वतः जॅकलिननेच केला खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.