कोरोनाचा मृत्युदर पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वात कमी

पिंपरी | महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलेले आहे. मुंबई, पुणे आणि इतर महत्वाच्या शहरात कोरोनाचे बरेच रुग्ण आढळत आहेत. पण या सर्व घटनांमध्ये एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

कालच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये जाहीर केले की, सध्या जे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल महाराष्ट्रात कार्यरत आहेत त्यामध्ये YCM रुग्णालयाचा मृत्युदर हा सर्वात कमी आहे.

बाकीच्या ठिकाणी मृत्यूदर सहा, सात, आठ टक्के असा दिसत असताना पिंपरी चिंचवडमध्ये १.८६ टक्के मृत्यूदर ही खरंच खूप समाधानकारक गोष्ट आहे.

YCM मध्ये आत्तापर्यंत ६० मृत्यू (शहरातील ३० आणि शहराबाहेरील ३०) झाले आहेत. कोरोनाचा जो उद्रेक होत आहे त्यामानाने हा आकडा खूप कमी आहे. मार्चमध्ये बारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भरती होते जे साधारणपणे वुहान आणि बाहेरदेशातून आलेले होते.

गेल्या चार महिन्यांच्या प्रयत्नाने पिंपरी चिंचवडमध्ये परिस्तिथी अजूनही नियंत्रणात आहे. YCM रुग्णालयातील डॉक्टर कोरोनाबधित रुग्णांना वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न करत आहेत. ज्या रूग्णांची वाचण्याची काहीच आशा नव्हती अशा रुग्णांना देखील डॉक्टरांनी पूर्णपणे बरे केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.