थोडे मतभेद असतात, पण आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहोत-जितेंद्र आव्हाड

 

मुंबई | कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पण काही बंधने शिथिल करण्यात आली आहे.

या कारणामुळे सध्या महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे.

याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या नाराजी नाट्यावर भाष्य केले आहे.

लॉकडाऊनवरून सरकारमध्ये थोडेसे मतभेद आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

नवी मुंबईतील कोरोना संकटाचा आढावा घेण्यासाठी आव्हाडांनी नवी मुंबई महानगरपालिकेत बैठक घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, येत्या आठवड्यात नवी मुंबईकरांसाठी दोन नव्या कोरोना टेस्ट लॅब सुरू करणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

तसेच, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, औषध पुरवठा वाढवण्याचे आदेशही यावेळी पालिका प्रशासनाला देण्यात आलेले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.