Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनासंदर्भातील सहा महत्वाच्या मागण्यांना राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्यता दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन मागे घेतले. या निर्णयानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून आनंद साजरा करण्यात आला. परंतु, ओबीसी समाजातील नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला थेट इशारा दिला. त्यांनी म्हटले, “ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत केली आहे, तर दलित, मुस्लिम, शेतकरी, आदिवासी आणि मायक्रो ओबीसींसाठी देखील अशीच व्यवस्था करावी. गरीबांचा कल्याण होणे गरजेचे आहे.”
भुजबळांबाबत बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे पक्षाचं अस्तित्व संपवणारे माणूस आहेत. कार्यकर्त्यांचा अधिकार नष्ट करणारे आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांची नेमणूक योग्य आहे, माझ्या कामात त्याचा काही संबंध नाही. माझा विषय आरक्षण आहे.”
सातारा गॅझेटिअरबाबत निर्णय न झाल्यास मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी इशारा दिला की, “जर सरकार सातारा गॅझेटिअरबाबत निर्णय घेण्यात यशस्वी नाही, तर मी पुन्हा रस्त्यावर जाणे बंद करेन. माझा समाज संभ्रमात राहणार नाही. मराठा समाजाला मी योग्य मार्गावर ठेवणार आहे.”
यावेळी त्यांनी समाजातील गोंधळ निर्माण करणाऱ्यांवरही टीका केली आणि सांगितले की, “कोणतेही गोंधळ करणारे माझ्या मराठा समाजात स्थान मिळवू शकत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणात समाविष्ट होईल, हे लवकरच दिसून येईल.”