भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेद्र सिंग धोनीने २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. महेद्र सिंग धोनी आता फक्त आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. धोनी एकमेव असा खेळाडू आणि कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या स्पर्धा जिंकल्या आहेत.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला आहे. २०११ मध्ये माहीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक देखील जिंकला आहे. भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्राफी जिंकण्यात भारतीय संघाला यश प्राप्त झाले आहे.
तामिळनाडूतील थिरूवल्लूर क्रिकेट अकादमीला महेंद्रसिंह धोनीनं भेट दिली आहे. कार्यक्रमाला धोनीबरोबर यावेळी चेन्नई सुपर किंग्सचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवास हे देखील धोनीसोबत उपस्थित होते. धोनीने यावेळी त्याच्या क्रिकेटच्या आठवणी उजाळा दिला आहे.
‘मी पहिल्यांदाच एका जिल्हा क्रिकेट संघटनेच्या यशाच्या कार्यक्रमात सहभागी झालो आहे. मी माझ्या जिल्हा क्रिकेट संघाचा आभारी आहे. क्रिकेटपटूंना त्यांच्या जिल्हा क्रिकेट टीमबद्दल अभिमान हवा. मला देशाकडून खेळल्याचा, देशाचं प्रतिनिधित्व केल्याचा अभिमान आहे. मी जिल्हा किंवा शालेय पातळीवर खेळलो नसतो तर हे कधीही शक्य झाले नसते.’ असे धोनीने कार्यक्रमावेळी सांगितले आहे.
भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली ६० कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी भारतीय संघाला २७ सामन्यामध्ये विजय मिळवता आला आहे तर, भारतीय संघाला १८ कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. १५ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.
धोनीने २०० एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वात ११० सामने जिंकले आहेत तर, ७४ एकदिवसीय सामने गमावले आहेत. भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली ७२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले ज्यामध्ये ४१ जिंकले आणि २८ सामने भारतीय संघाने गमावले आहेत.
महत्वाच्या बातम्या:-
गायक केकेचा शेवटचा cctv व्हिडीओ आला समोर; पाहून तुमच्याही काळजात पाणी पाणी होईल
मांसबंदी झाल्यानंतर मुस्लिम मालकाने बदलले हॉटेलचे नाव, स्टाफ आणि जेवण; म्हणाला, ‘पर्याय नाही’
भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे, त्यामुळे…; राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला ‘हा’ आदेश