‘… तर विकास दुबेला मीच गोळी मारली असती; विकास दुबेच्या पत्नीचे धक्कादायक वक्तव्य’

 

 

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील गुंड विकास दुबे याचा पोलिसांच्या तावडीतून पळून जात असताना, पोलिसांच्या हाताने एन्काऊंटर झाला आहे.

 

विकास दुबेवर कानपूरमधील आठ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्यासह ६० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहे. आता विकास दुबेची पत्नी ऋचा दुबे हिने मोठे वक्तव्य केले आहे.

 

विकास दुबेने आतापर्यंत अनेक घरे बर्बाद केली आहे. तो जर माझ्यासमोर आला असता तर त्याला मीच गोळी मारली असती, असे धक्कादायक वक्तव्य ऋचा दुबेने केले आहे. तिने ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे.

 

जेव्हा विकास दुबेचा एन्काऊंटर झाला होता. त्यानंतर त्याचा पोस्टमार्टम करण्यात आला. यांनतर विकास दुबेच्या अंत्यसंस्कार वेळीही ऋचा दुबेने धक्कादायक वक्तव्य केले होते.

 

ज्यांनी हे विकास दुबेसोबत केले आहे, त्यांनी हवे तेवढे पळून घ्या, त्याला अद्दल घडवल्याशिवाय मी राहणार नाही, गरज पडली तर मी हातात बंदुकही उचलेल, असे वक्तव्य ऋचाने संतापाच्याभरात तेव्हा केले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.