रवीना टंडनने(ravina tandan) नुकतीच एक मुलाखत दिली आहे ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या करिअरबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. अभिनेत्रीने असे अनेक खुलासे केले आहेत जे याआधी क्वचितच कोणाला माहित असतील. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलच्या अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.(then-i-used-to-clean-upside-down-in-the-studio)
बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिला काय काय करावे लागले याविषयी अभिनेत्रीने या मुलाखतीत सर्व काही सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभिनेत्रीचे काय म्हणणे आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीना टंडनने खुलासा केला आहे की, अभिनेत्री तिच्या करिअरच्या सुरुवातीला स्टुडिओ क्लीनर म्हणून काम करायची.
फक्त स्टुडिओच नाही तर तिथले बाथरूमही ती साफ करायची. बाथरूमसोबतच अभिनेत्रीला त्यांच्या उलट्याही साफ करायला लागायच्या. यासोबतच रवीना टंडनने ह्या गोष्टीचा खुलासा केला आहे की, दहावीपासून प्रल्हाद टक्करला असिस्ट करायला सुरुवात केली होती. त्यावेळी लोक रवीना टंडनला बघायचे आणि म्हणायचे की तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे काय करत आहात, तुम्ही कॅमेऱ्यासमोर असले पाहिजे.
त्या लोकांचे म्हणणे ऐकून रवीना टंडन हसायची आणि म्हणायची की मी आणि अभिनेत्री कधीच नाही. याविषयी पुढे बोलताना रवीना टंडन म्हणते की, मी बॉलीवूडमध्ये बाय डिफॉल्ट आले आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की मी अभिनेत्री बनू शकेन.
रवीना टंडन पुढे सांगते की- जेव्हा प्रल्हादच्या सेटवर कोणतेही मॉडेल नसायची तेव्हा तो मला सांगायचा आणि मग मी मेकअप करायची आणि मॉडेलप्रमाणे पोज द्यायची. रवीना टंडन पुढे सांगते की- तिने एकदा विचार केला की जर मला हे सगळं करायचं असेल तर मी फुकट का करू, मी प्रल्हादजींसाठी काम करतेच आहे तर, काही पैसे का नाही कमवावे.
त्यानंतर हळूहळू मी मॉडेलिंगला सुरुवात केली. जेव्हा मला चित्रपट मिळू लागले तेव्हा मला अभिनय माहित नव्हता पण मी हळू हळू सर्व काही शिकले. रवीना टंडनने पत्थर के फूल या चित्रपटातून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. यानंतर अभिनेत्रीने एकामागून एक असे अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. रवीना टंडनचे नशीब चमकले जेव्हा तिने मोहरा चित्रपटात काम केले. या चित्रपटाने रवीना टंडनला रातोरात स्टार बनवले.
महत्त्वाच्या बातम्या
‘या’ अभिनेत्रीला स्वत:पेक्षा हुशार आणि सुंदर समजते रेखा, म्हणाली, ‘तिने सगळ्यांना वेड लावले होते’
ईशा अंबानीच्या पार्टीत पती अभिषेक बच्चनसोबत बेधुंद नाचली ऐश्वर्या, पहा व्हायरल व्हिडिओ
“दुसऱ्याच्या दारात हनुमान चालिसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण आहे”
चिन्मय मांडलेकरने प्रेक्षकांना केली कळकळीची विनंती; म्हणाला, चित्रपट पाहत असताना चित्रपटाचा शेवट..