…तर लॉकडाऊन कराच; उद्धव ठाकरेंच्या विधानावर हरभजन सिंगचं वक्तव्य

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. तसेच रविवारी झालेल्या बैठकीत राज्यात  लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.

मात्र, या मुद्द्यावरून आता भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं मुख्यमंत्री ठाकरेंच्या विधानावर रोखठोक भूमिका घेतली आहे. “लोक जर सांगूनही ऐकत नसतील तर लॉकडाऊन कराच. लोक केव्हा गांभीर्यानं मुद्दा समजून घेणार आहेत आणि कसा तेच कळत नाही”, असा संताप हरभजननं व्यक्त केला.

आनंद महिंद्रांनी लॉकडाऊनवरून राज्य सरकारला सुनावले परखड बोल…
उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परखड बोल सुनावले आहेत. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं”, असे ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

‘मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात,’ असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

‘…तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा’
राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, मास्क याचे पालन होताना दिसत नाही.’

तसेच पुढे ते म्हणाले, ‘लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला  आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या 

…म्हणून अनिल अंबानीचे स्थळ घेऊन ऐश्वर्या रायच्या घरी गेले होते अमिताभ बच्चन

आनंद महींद्रांनी घेतली गरीबांची बाजू; उद्धव ठाकरेंना कडक शब्दांत सुनावले..

पैसे खात नाही असा अधिकारी-कर्मचारी पोलीस दलात नाही- निवृत्त IPS मीरा बोरवणकर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.