एका तरुणाने ७० लाख वार्षिक पॅकजेची नोकरी सोडून स्वतःची आयटी कंपनी स्थापन केली आहे. या तरुणाने आपल्या आयटी कंपनीमार्फत दोन वर्षात तब्बल १२ कोटींचा व्यवसाय केला आहे. या तरुणाची कथा सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या तरुणाचे नाव धनेश इंदोरे(Dhanesh Indore) असं आहे. कोरोना काळात धनेशने अनेक होतकरू तरुणांना आपल्या कंपनीत नोकरी दिली आहे.(The young man quit his job worth Rs 70 lakh and started an IT company)
धनेश इंदोरे या ३२ वर्षीय तरुणाचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील चांदवली खुर्द हे आहे. धनेशचे प्राथमिक शिक्षण गावात झाले. तसेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीसाठी विदेशात गेला. त्याला विदेशातील एका कंपनीत ७० लाख वार्षिक पॅकेज असलेली नोकरी मिळाली. पण धनेशला स्वतःच्या जिद्दीवर काहीतरी करायचं होतं. म्हणून धनेश ७० लाख वार्षिक पॅकेजची नोकरी सोडून भारतात आला.
धनेशने स्वतःची टेकऑर्बिट सोल्युशन नावाची आयटी कंपनी सुरु केली. कोरोना काळात पुण्यातील एका फ्लॅटमध्ये धनेशने या कंपनीची सुरवात केली. सुरवातीला या कंपनीमध्ये फक्त चार जण कामाला होते. पण आज या कंपनीमध्ये १२५ तरुण काम करत आहेत. एका वर्षामध्ये या कंपनीने दोन कोटींचा व्यवसाय केला आहे.
या कंपनीला मायक्रोसॉफ्ट, डेल, सॅप आणि गुगल या प्रसिद्ध कंपन्यांकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. या मोठ्या कंपनींच्या कॉन्ट्रॅक्टमुळे कंपनीचा टर्नओव्हर आता १२ कोटीं झाला आहे. दोनच वर्षात या कंपनीने दिमाखदार कामगिरी केली आहे. धनेश यांच्या टेकऑर्बिट सोल्युशन या कंपनीला परदेशातील अनेक आयटी कंपन्यांकडून पार्टनरशिप दिली जात आहे.
पुढील वर्षात ४० कोटींवर नेण्याचा आम्ही निश्चय केला आहे. या माध्यमातून आम्ही २५० नवीन नोकऱ्या निर्माण करणार आहोत, असे धनेश इंदोरे यांनी सांगितले आहे. धनेशमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने अमेरिकेतील गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडत महाराष्ट्रातील एका गावात आयटी कंपनीची स्थापना केली होती.
गावातील तरुणांना आयटी कंपनीमध्ये सहसा नोकरी मिळत नाही. म्हणून त्या तरुणाने गावातच आयटी कंपनी सुरु केली होती. या आयटी कंपनीमध्ये १० तरुण नोकरी करत आहेत, असे त्या तरुणाने सांगितले होते. गावामध्ये आयटी कंपनीसाठी मोठी इमारत बांधून त्यामध्ये अनेक होतकरू मुलांना नोकरी देण्याचे त्या तरुणाचे स्वप्न आहे.
महत्वाच्या बातम्या :-
९० वर्षीय ‘पद्मश्री’ कलाकाराची बिकट अवस्था, मोदी सरकारने सामान रस्त्यावर फेकत घराबाहेर हाकलले
पोलिसांनी १६ अटींसह राज ठाकरेंच्या भाषणाला दिली परवानगी; मनसेने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
तुमची लाडकी ‘अप्सरा’ दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; दिवस आणि ठिकाण देखील ठरलं!