पाकीस्तानसह जगातील ‘या’ देशांनी पब्जी गेमवर घातली बंदी; गुजरातमध्येही बंदी

इस्लामाबाद | सध्या जगभरातील तरुणांना पब्जीने वेड लावले आहे. या गेमचे तरुणांना व्यसन लागले आहे. या गेमच्या व्यसनामुळे काही ठिकाणी चुकीच्या घटनाही घडल्या आहेत.

या सर्व गोष्टींचा विचार करत पाकिस्तान देशाने पब्जी गेमवर बंदी आणली आहे. पाकिस्तानशिवाय जॉर्डन, इराक, नेपाळ, इंडोनेशियातील काही भाग आणि भारताच्या गुजरातमध्येही पब्जी गेमवर बंदी घालण्यात आली आहे.

समाजाच्या अनेक स्तरांतून या गेमसंदर्भात विविध तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे या गेमवर तात्पुरती बंदी घातल्याची माहिती पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथोरिटीने ट्विटरद्वारे दिली आहे.

गेम एखाद्या व्यसनाप्रमाणे असून यामुळे मुलांच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर नकारात्मक परिणाम होतात.

शिवाय या पब्जीमुळे तरुणांनी आत्महत्या केल्याचे वृत्तही समोर आले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, पाकिस्तानात या गेम साठीचा इंटरनेट अॅक्सेस बंद करण्यात आला आहे. मात्र ९ जुलै रोजी लाहोर उच्च न्यायालयात पब्जी गेमसंदर्भात सुनावणी होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.