‘शिवकुमारला फाशी द्या’ म्हणत संतप्त महिलांनी शिवकुमारला दिला चप्पलने चोप

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपुर्वी दिपाली यांनी सुसाइड नोट लिहून उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात शिवकुमारला नागपुरातून पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिस शिवकुमारला न्यायालयात हजर करत असताना महिलांनी रस्त्यावरच शिवकुमारला चप्पलेने बदडण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवकुमारला कोर्टात पोलिस वाहनातून नेण्यात आले होते. कोर्ट परिसरात मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्या. त्यांतर वाहनातून शिवकुमारला उतरवत असताना महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी शिवकुमारला चोपण्याचा प्रयत्न केला.

यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली. ‘शिवकुमारला आमच्या ताब्यात द्या’, ‘शिवकुमारला फाशी द्या’ अशा घोषणा महिलांनी दिल्या. तसेच शिवकुमारचे पोस्टर्स जाळले आहेत. महिलांना शांत करत अखेर साखळी करून पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले.

कोर्टात हजर केल्यानंतर शिवकुमारला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अशी ओळख असलेल्या दीपाली चव्हाण यांनी उप वनसंरक्षक शिवकुमारच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने राज्यभर संतापाची लाट पसरली आहे.

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. दीपाली यांच्यावर त्यांच्या सासरी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या सोबत काम करण्याऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या-
अरे बापरे! बाईकवर मस्ती करायच्या नादात तरूण उडाला हवेत, पाहा व्हिडिओ
“मोदीजी अजून किती फेकणार?, हद्द झाली राव”
DFO ला फाशी द्या नाहीतर…, दिपाली चव्हाणच्या आईची संतापजनक मागणी
रात्री मला भेटायला बोलवून…; लेडी सिंघम दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासे

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.