जगात अशा काही घटना घडतात, ज्या अतिशय धक्कादायक असतात. कितीही वेळ गेला तरी त्याच्या आठवणी लोकांच्या मनात जिवंत राहतात. जून २०१८ मध्ये इंडोनेशियामधून अशी घटना समोर आली होती, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. येथे एका सत्तावीस फुटी अजगराने महिलेला गिळले होते.(Dragon, indonesia, corpses, video)
अजगराचे फुगलेले पोट पाहिल्यानंतर संशयाच्या आधारे पोट कापले असता महिलेचा मृतदेह अजगारच्या पोटातून बाहेर काढण्यात आला. आजच्याच दिवशी चार वर्षांपूर्वीची घटना घडली होती. त्यावेळी ही घटना घडली, तेव्हा त्याचा व्हिडिओ आणि फोटो समोर आले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
आता पुन्हा एकदा त्याचे फोटो इंटरनेटवर शेअर होत आहेत. या घटनेत दोन मुलांची आई, जी ५४ वर्षांची होती, तिचा मृतदेह एका महाकाय अजगराच्या पोटातून बाहेर काढण्यात आला होता. ही घटना इंडोनेशियामध्ये घडली आहे. जेव्हा त्या महिलेचा मृतदेह सापडला तेव्हा तो अजगराच्या पोटातील आम्लात पूर्णपणे भिजला होता आणि वितळू लागला होता.
घटनेच्या दिवशी ती घरातील बागेत गेली होती. यानंतरही ती घरी आली नाही. लोक तिचा शोध घेऊ लागले पण अपयशी ठरले. यानंतर रात्रीच्या सुमारास तिची चप्पल पुढे झुडपात आढळून आली, तेथे एक महाकाय अजगरही दिसला. या अजगराचे पोट खूप फुगले होते. अशा स्थितीत अजगराने तिला गिळले की काय अशी शंका लोकांना आली.
या संशयाच्या आधारे अजगराचे पोट फाडले असता प्रकरण खरे असल्याचे निष्पन्न झाले. महिलेचा मृतदेह अजगराच्या पोटात सापडला. महिलेचा मृतदेह अजगराच्या पोटातून बाहेर काढला असता अजगराच्या पोटात सापडलेल्या अॅसिडमध्ये तो पूर्णपणे भिजलेला होता. या आम्लाच्या साह्याने अजगर आपल्या भक्ष्याला गिळतो आणि नंतर त्याचे पचन होते.
महिलेच्या दोन्ही मुलांनी अजगराचे पोट कापले होते. त्यांची आई आत निर्जीव पडून होती. अजगराच्या पोटातून बाहेर काढल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. एखाद्या प्राण्याने मानवाला संपूर्ण गिळण्याची ही पहिलीच वेळ होती.
महत्वाच्या बातम्या
१३ जूनची शेवटची रात्र सुशांतसाठी होती खुपच बिकट, अंत:करणाला हादरवून सोडतील ‘ते’ शेवटचे क्षण
…म्हणून अजितदादांना भाजप नेत्यांनी भाषण करू दिले नाही; रोहीत पवारांनी सांगीतले कारण
गौतम गंभीरवर संतापली स्वरा भास्कर, म्हणाली, बुलडोझरचा आवाज ऐकू येत नाही पण..
नीरज चोपडाने स्वत:लाच मागे टाकले, इतक्या लांब भाला फेकला की बनला नवा राष्ट्रीय विक्रम