गरीब परिस्थीतीमुळे कुत्र्याचं मांस पोटच्या मुलांना खायला देत होती ही महिला

आई आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करत असते. लहान असल्यापासून ते मोठं होईपर्यंत ती मुलांना चांगले संस्कार देत असती. ती मुलांना जे हवं ते आवडीचं खायला बनवून देते. मात्र युक्रेन देशाच्या खारकीव शहरात एक अशी घटना घडली आहे जी ऐकून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल.

घरच्या बिकट परिस्थितीमुळे ३० वर्षीय महिला आपल्या दोन लहान मुलांना भटक्या कुत्र्यांना मारून त्यांचे मांस खायला घालत होती. पोलिसांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी महिलेच्या घरात जावून पाहिले असता घरातील वातावरण बघून पोलिसही हादरून गेले.

लिलिया ग्रेनेन्को असं या महिलेचं नाव असून अनेक वर्षांपासून तिने घरामध्ये कचरा गोळा करून ठेवला होता. घरात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले होते. महिलेच्या घरात वीजही नसल्यामुळे ती खूप दिवसांपासून दोन लहान मुलांना घेऊन अंधारातच राहत होती.

दरम्यान पोलिसांनी लिलिया आणि तिच्या दोन मुलांना रूग्णाल्यात दाखल केले आहे. त्यांच्यावर योग्य उपचार केले जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ती अशी करत होती का यामागे काही वेगळचं कारण आहे याचाही तपास पोलिस करणार आहेत.

घटना उघडकीस आल्यानंतर प्राणीप्रेमींनी लिलियावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लिलियाजर यामध्ये दोषी आढळली तर तिला ५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
पाच महिन्यांच्या मुलीसाठी आई-वडिलांची धडपड, 16 कोटींच्या इंजेक्शनसाठी क्राउड फंडिंग
भाजपच्या वेबसाईटवर खा. रक्षा खडसेंचा लाजिरवाना उल्लेख; वाचून तुम्हालाही संताप येईल
आंदोलन चिघळवणाऱ्या भाजपच्या दीप सिंधुला शेतकऱ्यांनी पळवून लावले; पहा व्हिडीओ
संजय दत्तच्या पहील्या पत्नीने मृत्यूपूर्वी लिहीलेले ‘हे’ पत्र वाचून सर्वांना बसला धक्का; मुलगी त्रिशला झाली भावूक

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.