महीला पोलीस ओळख लपवून साध्या कपड्यांवर बस स्टॉपवर बसली; टवाळखोरांनी छेडताच असा धडा शिकवला की..

मुंबई। सोशल मीडियावर दिवसाला हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडिओ हे मजेशीर असतात, काही थरारक असतात तर काही सर्वाना हैराण करणारे असतात. मात्र काही व्हिडिओ हे नेटकऱ्यांचे लक्ष लगेच आकर्षित करून घेतात.

मात्र सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून सर्वांनाच धडकी भरली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. हा व्हिडिओ एका कॅमेऱ्याची फुटेज आहे.

ज्यात एक महिला वेश बदलून बदमाशांना चांगलाच धडा शिकवताना दिसत आहे. ती महिला बस स्टॉपवर बसली आहे. जिथे तीन तरुण तिला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र थोड्या वेळाने ही महिला आपलं संपूर्ण रुप बदलते व पोलिसांच्या अवतारात दिसते.

महिला पोलीस असल्याचे समजताच मुलांची अवस्था बिघडते आणि ते महिलेसमोर सोडण्यासाठी विनवणी करताना दिसतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचे सांगत आहेत.

हा व्हिडिओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला हे अजून समजलेलं नाही. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती महिला बस स्टॉपवर बसली आहे आणि एक मुलगा तिच्याशी बोलत आहे. काही क्षण बोलल्यानंतर तो त्या महिलेच्या शेजारी बसला. यानंतर, थोड्या अंतरावर बसलेल्या दोन मुलांपैकी एक त्या महिलेला विचारतो आणि तिच्या दुसऱ्या बाजूला बसतो.

अचानक ती महिला रागाने उभी राहते आणि ति तिच्या खऱ्या ड्रेसमध्ये येते. हे बघून मुलांची अवस्था बिघडते. कारण वर घातलेला ड्रेस उतरवल्यानंतर ती महिला पोलिसांच्या गणवेशात येते. हे पाहताच हे तिघे प्रचंड घाबरताना दिसत आहेत.

24 सेकंदांच्या या क्लिपला काही वेळातच 13 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 1 हजाराहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच, यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व काहीजण प्रचंड हसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
‘राष्ट्रवादीचा गृहमंत्री असल्यावरच दाऊद कसा सक्रिय होतो?’
ती चारित्र्यहीन आहे, तिला लाजलज्जा नाही, पडद्यावर चुंबन घेते; मल्लिकाने सांगीतला बाॅलीवूडचा खतरनाक अनुभव 
मुस्लिम कुटुंबाच्या घरी दरवर्षी येतो बाप्पा! बाप्पामुळेच पुत्ररत्न लाभल्याचा रेहमानचा दावा
उद्धव ठाकरे हे ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलीन इकतेच लोकप्रिय, जावेद अख्तरांकडून कौतुकाचा वर्षाव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.