Share

भीक मागून महिलेने जमवले लाखो रुपये, या पैशांतून केलेलं काम जाणून बसेल आश्चर्याचा धक्का

आपल्या भारत देशात अनेक धार्मिक स्थळे आहेत, जिथे लोक देवाचे दर्शन घेतात आणि त्यांचे जीवन सुखी होण्यासाठी प्रार्थना करतात. लोकही या मंदिरांमध्ये जाऊन त्यांच्या श्रद्धेनुसार आणि स्थितीनुसार दान करतात. याशिवाय असे अनेक लोक आहेत जे मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्यांनाही काही पैसे किंवा अन्न(Food) दान करतात.(The woman  collected lakhs of rupees from begging, will be surprised to know the work done with this money)

पण एखाद्या भिकाऱ्याने मंदिराला देणगी दिली, अशी घटना तुम्ही कधी ऐकली नसेल. पण अशीच एक घटना कर्नाटकातील पोलाली गावात घडली आहे. एका महिला भिकारीने मंदिरासाठी एक लाख रुपयांची मदत केली आहे. ही महिला मंदिराबाहेर भीक मागून आपला उदरनिर्वाह करते. पण या महिलेने देवावरील श्रद्धेपोटी मंदिराला मोठी रक्कम दान केली आहे. सोशल मीडियावर या महिलेचे कौतुक केले जात आहे.

या महिलेचे नाव अश्वत्थम्मा आहे. या महिलेचे नाव वय ८० वर्षे आहे. ही वृद्ध महिला भिकारी कर्नाटकातील मंगळुरूची रहिवासी आहे. या भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेने पोलाली गावातील राज राजेश्वरी मंदिराला अन्नदान सेवेसाठी एक लाख रुपये दिले आहेत. राज राजेश्वरी मंदिरात दररोज भक्तांना प्रसाद दिला जातो.

या प्रसादासाठी अश्वत्थम्मा यांनी दिलेली रक्कम वापरली जाणार आहे. ही महिला गेल्या काही वर्षांपासून राज राजेश्वरी मंदिराच्या प्रांगणात भीक मागत आहे. मंदिरांबाहेर भीक मागून मिळालेल्या पैशांतून ही महिला आपला उदरनिर्वाह करायची आणि उरलेले पैसे साठवत होती. एका लाख रुपये जमा झाल्यानंतर महिलेने ती रक्कम मंदिराच्या ट्रस्टला देण्याचा निर्णय घेतला.

अश्वत्थम्माने आपले औदार्य दाखविण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील तिने मंदिराला देणगी दिली आहे. वर्षभरापूर्वी अश्वत्थम्माने उडुपीच्या विविध मंदिरांना पाच लाख रुपयांची देणगी दिली होती. गरजू लोकांना अन्न मिळण्यासाठी देणगी दिल्याचे अश्वत्थम्माने सांगितले. अश्वत्थम्मा अयप्पा स्वामींची मोठी भक्त आहे.

अश्वत्थम्मा पोलाली मंदिराच्या वार्षिक जत्रेमध्ये भीक मागते आणि त्यामधून मिळणाऱ्या पैशांतून अन्नदानाची सेवा करते, असे त्या परिसरातील नागरिकांनी संगितले आहे. अश्वत्थम्मा गेल्या २५ वर्षांपासून विविध मंदिरांमध्ये अन्नदानासाठी पैसे दान करत आहे. कोणीही उपाशी राहू नये, यासाठी पैसे दान करत असल्याचे अश्वत्थम्माने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“मला आणि आपल्या मुलांना तुझा अभिमान वाटतो..” पाकिस्तानात बॉम्बस्फोट घडवलेल्या महिलेच्या पतीचे ट्विट
VIDEO: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ठरली ओप्स मुव्हमेंटची शिकार, सर्वांसमोर खाली आला ड्रेस अन्…
या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर झाला बलात्काराचा आरोप; चित्रपटसृष्टीत खळबळ

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now