पतीच्या निधनानंंतर कब्रस्थानमध्ये बनवलं महिलेने घर, पतीच्या आवडीचे गाणेही लावते

आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी काहीही  करण्याची तयारी अनेकांची असते. पतीपत्नी मरेपर्यंत साथ देण्याची शपथ खात असतात. पण आपल्या जवळच्या व्यक्तीला जर काय झाले तर त्यांची जगणं अवघड होऊन  जातं. अर्जेंटीनिया देशात अशीच एक अजब घटना घडली आहे.

पतीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका ४२ वर्षीय पत्नीने त्याच्या निधनानंतर थेट कब्रस्थानमध्ये  राहायचं ठरवलं आणि ती काही दिवस पतीच्या कब्रजवळ जाऊन राहते. एंड्रियाना विल्लारियल असं त्या महिलेचं नाव आहे.

कब्रजवळ राहण्यास गेल्यास एंड्रियाना वाटतं की तिचा पती तिच्या सोबत आहे आणि त्याच्यासोबत ती वेळ घालवू शकेल. एंड्रियाना यांच्या पतीने दोन वर्षापुर्वी आत्महत्या केली होती. एंड्रियाना म्हणतात की माझ्या पतीने आत्महत्या का केली माहिती नाही. पण तो माझ्यावर खुप प्रेम करायचा. तो एक खूप चांगला पती होता.

स्थानिक वृत्तपत्राच्या माहितीनुसार, काही दिवसांपुर्वी कब्रस्थान जवळ राहणाऱ्या लोकांना मोठमोठ्याने गाणे लावल्याचा आवाज येऊ लागला होता. तसेच रात्रीच्या वेळी तिथे लाईट लावली जात असल्याचं त्यांना दिसलं. यामुळे परिसरातील लोक घाबरून गेले होते.

पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तपास करून एंड्रियानाला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने सांगितले की पतीच्या निधनानंतर मी खचून गेले होते. त्यामुळे त्याच्या आठवणीत नेहमी दु:खी असायचे. त्यामूळे मला त्याच्या जवळ राहण्याची इच्छा झाली.

त्यामूळे मी वर्षातून ४ ते ५ वेळा कब्रस्थानमध्ये येऊन पतीसोबत राहते. पतीच्या आवडीचं जेवण बनवते. त्याच्या आवडीची गाणी लावते. पतीचं आणि माझं स्वप्न होतं की स्वत:चं घर असावं. त्यामूळे आम्ही पैसे जमा केले होते.

मात्र माझ्या पतीचे निधन झाले. पण पतीचं स्वप्न मी पुर्ण करण्याचं ठरवलं आणि  कब्रजवळ  घर बांधण्याचं ठरवलं. त्यामूळे मला पतीच्या जवळ असल्याचं जाणवतं. पतीची इच्छाही पुर्ण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
माणूसकीला सलाम! कोरोनाच्या संकटात भीक मागून या भिक्षूकाने दान केले ९० हजार
कॉमेडीयन सुनील ग्रोवरची पत्नी दिसते अभिनेत्रीपेक्षाही सुंदर; पहा फोटो
मंदिर निर्माण होतंय, पण हॉस्पिटलमध्ये बेड मागू नका; स्वरा भास्करची मोदींवर जोरदार टीका
पुण्यातील ‘या’ मोठ्या कंपनीने चीनला कंपनी विकून १४१९ कामगारांना केले कमी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.