वाऱ्याची झुळूक आली आणि मी बाळंतीण झाले, महिलेच्या दाव्याने डॉक्टरही चक्रावले

इंडोनेशिया |  इंडोनेशियामधील सिआमजुरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका 25 वर्षीय महिलेने वाऱ्याची झुळूक थेट गुप्तांगात जावून बाळांत झाल्याचा दावा केला आहे. महिलेच्या दाव्याने डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. याची चर्चा सध्या संपुर्ण इंडोनेशियामध्ये होत आहे.

चुम्मा! पतीची लाइव्ह मीटिंग सुरू असताना चुम्मा घ्यायला आली पत्नी अन्….; पाहा व्हिडिओ

सिती झैनाह असं त्या महिलेचं नाव आहे. तिने सांगितलं की, घराच्या हॉलमध्ये खिडकीत मी बसले असताना खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली आणि माझ्या गुप्तांगात गेली. त्यानंतर काही मिनिटांनीच माझ्या पोटात जोरदार वेदना होऊ लागल्या. आणि त्यानंतर मी दवाखान्यात तपासणीसाठी गेले.

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरूणीने लग्नाला नकार दिल्याने तरूणाने उचलले टोकाचे पाऊल

कम्युनिटी क्लिनिकचे संचालक इमॅन सुलेमान यांनी या प्रकाराबाबत म्हटले की रूग्णालयात एक महिला दाखल  झाली होती. तिने सांगितले की दुपारी प्रार्थनेनंतर मी खिडकी समोर पलंगावर झोपले होते. त्यानंतर जोरदार वारं आलं माझ्या गुप्तांगात गेलं. मग त्यानंतर माझ्या पोटात वेदना सुरू झाल्या. महिलेच्या या दाव्याने डॉक्टरही चक्रावून गेले आहेत.

रूग्णालयात सीतीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. मुलीचं वजन 2.9 किलो भरलेलं आहे. दरम्यान या प्रकाराची तक्रार सिती झैनाहने पोलिसांना दिली आहे. आता याचा तपास करून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

औरंगाबादेत करोना लस घेतलेले दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणेची उडाली झोप

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.