बायकोच्या प्रेमासमोर नवरा झुकला; बायकोचं तिच्या प्रियकरासोबत स्वत:च लावून दिलं लग्न

भागलपुर | आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे लग्न होय. लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने संसाराला सुरूवात होते. मात्र लग्नानंतर नवरा बायकोच्यामध्ये कोणता तरी तिसरा व्यक्ती येतो आणि सुखात चाललेला संसार बिघडून जातो.

बिहारच्या भागलपुर राज्यातही अशीच एक घटना घडली आहे. लग्नानंतर पत्नीचे दुसऱ्या तरूणाबरोबर प्रेमसंबंध जुळले आणि याची माहिती पतीला झाल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. तरीही त्याने स्वत:ला सावरत पत्नीचे त्या तरुणासोबत लग्न लावून दिले आहे.

भागलपुरमधील सुल्तानगंज येथील उत्तम मंडल या तरूणाचे सात वर्षापुर्वी खगडिया गावातील सपना कुमारी नावाच्या मुलीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांचा सुखाचा संसार सुरू होता. लग्नानंतर त्यांनी दोन मुलांना जन्म दिला.  मात्र सुखात चाललेल्या संसारात कुणी तरी येईल. याची कल्पना पती उत्तम मंडलला कधीही आली नव्हती.

लग्नानंतर  काही दिवसानंतर सपना कुमारीचे नात्यातीलचंं एका राजू कुमार नावाच्या मुलाशी प्रेमप्रकरण सुरू झाले. त्यानंतर सपना कुमारीला पतीपेक्षा हा तरुणचं जवळचा वाटू लागला. पतीला याची माहिती झाल्यावर त्याच्या पायाखालची जमीनचं सरकली.

पत्नीला पती उत्तमने अनेकवेळा समजून सांगितले. मात्र प्रेमात बुडालेल्या पत्नीने पतीचे काही ऐकले नाही. यावरून पतीपत्नीमध्ये सतत वाद होत होते. अखेर पत्नी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहून पतीने एक निर्णय घेतला.

पत्नीला आपल्यासोबत राहण्यापेक्षा प्रियकर राजू कुमारसोबत राहायचं असल्याचं पाहून पतीने दोघांचं लग्न लावून देण्याचं ठरवलं. अखेर पतीने  दुर्गा मंदिरात पत्नीचं आणि तिचा प्रियकर राजू कुमारचं लग्न लावून दिलं.
महत्वाच्या बातम्या-
क्रूरतेचा कळस! गर्भवती वाघीणीला जिवंत जाळले; वाघीनीच्या पोटात होती चार पिल्ले
ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची खरी गरज कधी लागते.? एम्सचे डॉक्टर म्हणतात..
कुटुंब कोरोनाविरूद्ध लढा देतयं, मी त्यांच्यासोबत राहीलं पाहीजे; म्हणत अश्विनने सोडली आयपीएल
प्रेमात धोका मिळाल्यामूळे आजही अविवाहीत आहेत बॉलीवूडचे ‘हे’ अभिनेते

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.