बायकोने आधी नवऱ्याला सेक्स व्हिडिओ दाखवले, अन् नंतर त्याचे हातपाय बांधून केले ‘हे’ कृत्य

नागपुर | नागपुर शहरातील गणेशपेठ परिसरात एका व्यक्तीचा खून झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हात पाय खूर्चीला बांधलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा गळा चिरून खून झाला होता. मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण मलिक (वय.६५) असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास करून या प्रकरणाचा छडा लावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, लक्ष्मण मलिक हे सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी तब्बल पाच महिलांशी विवाह केला होता. शहरातील रजत संकूल परिसरातील एका फ्लॅटमध्ये  राहत होते. त्याच राहत्या घरात मलिक यांच्या गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता.

घटनेच्या दिवशी मलिक यांची पाच नंबरची पत्नी त्यांना भेटायला आली होती. तिने फ्लॅटमध्ये आल्यानंतर मलिक यांच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर तिने मलिक यांचे हातपाय एका खूर्चीला बांधून ठेवले. नंतर पत्नीने त्यांना मोबाईलवर सेक्स व्हिडिओ दाखवले. मग धारदार चाकूने गळ्यावर वार करून मलिक यांची निर्घूणपणे हत्या केली आहे.

पोलिसांनी त्यांच्या पाचही पत्नींना चौकशीसाठी बोलावून घेतले. पाच नंबरच्या पत्नीने तपासात पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना तिच्यावरच संशय बळावला आणि तिची सखोल चौकशी करून तिला बोलतं केलं.

मलिक हे पाच नंबरच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामूळे त्यांच्यात सतत वाद होत होते. मलिक हे सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांना महिन्याला पेन्शन चालू होती. या पेन्शनच्या पैशावरूनही मलिक आणि पाचव्या नंबरच्या पत्नीत भांडणे होती.

सततच्या भांडणाला कंटाळून मलिक यांच्या पत्नीने मलिक यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यानूसार तिने अगदी धक्कादायक अवस्थेत पतीची हत्या केली आहे. खूनाच्या या घटनेमुळे संपूर्ण नागपुर शहरात भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-
तीरानंतर पुण्याच्या युवानलाही १६ कोटींच्या इंजेक्शनची गरज, आई-वडिलांची मदतीची हाक
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा पुण्यात रास्ता रोको, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक
फडणवीस जोमात महाविकास आघाडी कोमात! महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्याला दणका
धक्कादायक! एकाच मुलीवर प्रेम करणाऱ्या दोन भावांची रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.