सगळा रस्ता कंडोंमने भरलाय! हायवेर कंडोमचा खच पाहूण उडाली खळबळ

बंगळुरू। कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातून एक धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. तुमकूरजवळील नॅशनल हायवे 48 वर काथसांद्रा आणि बटवाडी मार्गावर चक्क कंडोमचा ढिगारा पसरलेला पाहायला मिळाला आहे. रस्त्यावरील हा पसारा पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

हा हायवे दिल्लीपासून तामिळनाडूची राजधानी चेन्नईपर्यंत जातो. खरंतर हायवे म्हटलं की प्रचंड वेगाने धावणाऱ्या गाड्या आल्या आजूबाजूला माणसं आली मात्र कधी संपूर्ण हायवेवर कंडोम पसरलेले कधी कोणी पाहिले न्हवते. त्यामुळे हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर कितीतरी किलोमीटरपर्यंत हे कंडोम पसरलेत. रस्त्याच्या किनाऱ्यावर कंडोम पडले होते. रस्त्यात जिथं पाहावं तिथं कंडोमच कंडोम दिसले. त्यामुळे सर्वांनाच शॉक बसला. मात्र रस्त्यावरील हे कंडोम पाहून अनेक अंदाज लावले जात आहेत.

इतके कंडोम हायवेवर कसे काय, याचाच आश्चर्य सर्वांना वाटत आहे. कुणीतरी दुसऱ्या ठिकाणांहून कंडोम आणून इथं पसरवले असतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. किंवा कंडोम कंपनीच्या कारमधून हे कंडोम पडले असावेत, असाही अंदाज बांधला जातो आहे.

मात्र नेमकं हे कंडोम कुठून आले हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तुमकूरजवळील नॅशनल हायवे 48 हा दिल्लीपासून तामिळनाडूची राजधानी चेन्नईपर्यंत जातो. सात राज्यांमधून हा हायवे आहे. यामध्ये दिल्ली, हरयाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिलनाडूचा समावेश आहे.

तुमकूर हे मोठ्या औद्यागिक शहरांपैकी एक आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या शहरात असा धक्कादायक प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यात हे कंडोम असल्याने नागरिक अनेक तर्क वितर्क लावत आहेत. त्यामुळे आता या हायवेवर एवढे कंडोम कुठून आले याचा शोध सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
लंडनची मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावी आले; आता गायी म्हशींच्या व्हिडीओतून महिन्याला ५ लाख कमावतात
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव शिवसेनेमुळे झाला असं लोकं का म्हणतात? वाचा.. 
मुख्यमंत्र्यांनी वचन पाळले! ऑलिम्पीक विजेत्यांसाठी स्वत: जेवन बनवत, स्वतःच्या हाताने जेऊ घातले 
घटस्फोट म्हणजे फुकटचे मिळालेले पैसे! शिखर आयेशाच्या घटस्फोटाच्या बातमीने नेटकरी संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.