कोरोनाने आधी खासदाराला हिरावले, अन् आता २ मुलांचा घेतला जीव; अख्ख कुटूंबच झालं उध्दवस्त

भुवनेश्वर | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कोरोनामुळे आजवर कलाकारांनी, खेळाडूंनी, नेत्यांनी जीव गमावले आहेत. देशातील प्रतिष्ठीत व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अनेकजण कोरोनावर मात करत घरी परतले आहेत. मात्र काहींचा उपचार सुरू असतानाचं निधन झालं आहे. अशातच कोरोनाने एका खासदाराचं अख्खं कुटूंब उध्दवस्त झालं आहे.  प्रसिध्द शिल्पकार आणि राज्य सभेतील खासदार रघुनाथ मोहपात्रा यांच्यासह त्यांच्या दोन मुलांना कोरोनाने हिरावले आहे.

राज्यभेतील खासदार रघुनाथ मोहपात्रा (वय ७८) यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी २२ एप्रिल रोजी भुवनेश्वर येथील एम्स रूग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस मोहपात्रा यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर ९ मे रोजी रघुनाथ मोहपात्रा यांचे निधन झाले.

रघुनाथ मोहपात्रा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला होता. या दु:खातून सावरत असताना मोहपात्रा यांचा मोठा मुलगा जसवंत मोहपात्रा आणि छोटा मुलगा प्रशांत मोहपात्रा यांनाही कोरोनाची लागण झाली. उपचार सुरू असताना त्यांनाही कोरोनाने हिरावले आहे.

प्रशातं मोहपात्रा यांचा बुधवारी (दि १९) मृत्यू झाला आहे. प्रशांत हे ओडिशा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली आहे. त्यांचा मोठा भाऊ जसवंत मोहपात्रा वय (५२) यांचेही गुरूवारी (दि२०) निधन झाले आहे.

कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल रघुनाथ मोहपात्रा यांना आजवर पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१८ मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. रघुनाथ मोहपात्रा आणि मुलांच्या  निधनाने दु:ख व्यक्त केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतूक
मी हे खपवून घेणार नाही; लग्नाच्या पोस्टवर घाण कमेंट करणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीची थेट धमकी
किती फिरतोय रे राजा, स्वत:ची काळजी घेऊन काम कर; उद्धव ठाकरेंच्या शब्दांनी साळवींच्या डोळ्यात पाणी
२०११ ला पाकिस्तानी खेळाडूंना ताज हॉटेलमध्ये थांबू देण्यासाठी तयार का नव्हती भारतीय टीम?

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.