मेथीची भाजी समजून पूर्ण कुटुंबाने खाल्ला गांजा; संपूर्ण कुटुंब रुग्णालयात भरती

कन्नौज | मेथीची भाजी समजून परिवारातील सर्व सदस्यांनी गांजा खाल्ला आणि सर्व जण बेशुद्ध पडल्याची धक्कायदायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील ६ सदस्यांवर रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

घरातील सर्व जणांनी मेथीची भाजी समजून गांजा खाल्ला आणि त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. सर्व कुटुंबीय घरातच बेशुद्ध पडले त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

हा सर्व प्रकार गावातील एका व्यक्तीमुळे घडला. त्याने चेष्टा-मस्करीमध्ये मेथीची भाजी आहे असं सांगून त्यांना गांजा दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

कन्नौज सदर कोतवाली भागातील मियागंज भागात नवलकिशोर नावाच्या व्यक्तीने ओमप्रकाश यांचा मुलगा नितेशला कोरडी मेथीची भाजी आहे असं सांगून एक पिशवी दिली. त्यानंही ती भाजी समजून घरी जाऊन बनवून खाल्ली.

संध्याकाळी मात्र त्याच्या सर्व कुटुंबियांची तब्येत बिघडली. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले आणि सर्व कुटुंबियांना रूग्णालयात दाखल केले. भाजी म्हणून गांजा देणाऱ्या नवलकिशोरला पोलिसांनी ताब्यात घेतले.

गंमत करणे एखाद्याला किती महागात पडू शकते हे या घटनेवरून कळते. अनेकदा छोटीशी गंमत आपल्या जीवावर बेतू शकते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.