तीन वर्षांपूर्वी झाले होते लग्न, हनिमूनला गेल्यावर झाला मोठा खुलासा; पतीच निघाला मुलगी

सध्या जगात अनेक गोष्टींमध्ये झपाट्याने बदल झाल्याचे आपण पाहत आहोत. तसेच लग्न पद्धतींमध्येही मोठे बदल झाले आहेत. आता बरेचसे लोक लग्न करण्याऐवजी लिविंग रिलेशनशिप मध्ये राहतात. तर काही वयाच्या अगदी अखेरीस लग्न करतात. मात्र सध्या एक नवीन ट्रेंड सुरू झाल्याचे आपण आजूबाजूला पाहतोच.

ट्रेंडनुसार दोन मुलं एकमेकांसोबत लग्न करतात तर काही काही मुलीही एकमेकांसोबत लग्न करतात. मात्र आता ब्रिटनमधील एक प्रकरण आहे जे या सर्वांपेक्षा वेगळं आहे. आणि या प्रकरणाची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.

या प्रकरणातून अस समोर आलं आहे की, तीन वर्षापूर्वी नवरदेव झालेल्या एका व्यक्तीला आता नवरीबाई बनायचं आहे. ऐकून चकित व्हाल, पण हे खरं आहे . या तर जाणून घेऊयात नक्की प्रकारण काय.

ब्रिटनमध्ये 33 वर्षाचा जॅक आणि 30 वर्षाच्या हार्वीनं यांनी 2018 मध्ये लव्ह मॅरेज केलं होतं. त्यांच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर दोघंही हनीमूनसाठी विस्टशायरच्या सेंटर पार्क्समध्ये गेले. मात्र हनिमून दरम्यान हार्वीनंला समजलं की तिचा पती हा एक मुलगा नसून मुलगी आहे.

मात्र त्यानंतर हार्वीनं मोठया धीरानं स्वतःला सांभाळून जॅकचा स्वीकार केला आहे. अशा व्यक्तींना अनेक समजातील लोकांना तोंड द्यावं लागतं , म्हणूनच त्याची पत्नी हार्वीनं सांगितलं, की तिच्या पतीला वयाच्या 11 व्या वर्षीपासूनच मुलगी बनण्याची इच्छा होती. ही गोष्ट हार्वीला समजली तेव्हा तिनं 45000 पाउंड खर्च करुन आपल्या पतीची सर्जरी करत महिला बनण्यासाठी त्याची मदत केली.

लग्नाच्या 2 महिन्यांनंतर जॅकनं आपल्या पत्नीला सांगितलं, की त्याला नेहमीच एक ट्रान्सजेंडर बनण्याची इच्छा होती. हार्वीनं सांगितलं की, की जेव्हा तिच्या पतीनं पहिल्यांदा मुलीचा ड्रेस घातला आणि तिनं स्वतःत त्याचा मेकअप केला तेव्हा जॅकवरुन रायना बनल्यावर तिचा पती अत्यंत आनंदी होता.

त्यानंतर हार्वी आता रायना म्हणजेच जॅकसोबतच पुन्हा एकदा लग्नगाठ बांधण्याचा विचार करत आहे. मात्र यावेळी हे दोघे हार्वी आणि जॅक नसून रायना आणि हार्वी असतील.

महत्वाच्या बातम्या
राजकूमार संतोषीपासून विक्रम भट्टपर्यंत ‘हे’ दिग्दर्शक त्यांच्याच अभिनेत्रीच्या प्रेमात झाले होते पागल
भिकारी बनणे संजीव कुमारला पडले महागात; दिग्दर्शकाने न ओळखताच सेटवरुन पळवून लावले
बायको घरी नसताना मैत्रिणीला घरी बोलावलं, तासाभरात जे घडलं, त्याने तरुणच हादरला
डेव्हिड वॉर्नरचा कुटुंबासोबत भन्नाट डान्स, व्हिडिओ पासून व्हाल त्याचे फॅन, पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.