प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

अभिनेता अक्षय कुमारचा बेल बॉटम हा चित्रपट गेल्या
काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे समोर आले आहे.

यापूर्वी अक्षय कुमारचा बेल बॉटम हा चित्रपट २ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट २७ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने स्वत: चाहत्यांना माहिती दिली आहे की त्याचा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

अभिनेत्याने सांगितले आहे की मला माहित आहे की बेल बॉटमच्या प्रदर्शनासाठी तुम्ही संयमाने वाट पाहिली, पण जगातील मोठ्या पडद्यावर येत अखेर आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यास आनंद होत नाही. 27 जुलै रोजी जगभरातील मोठ्या स्क्रीनवर येत आहे.

अक्षयच्या या घोषणेने चाहत्यांना आनंद झाला आहे, तसेच मागील दिवसांत अक्षयचा एकही चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला नाही. अशा परिस्थितीत बेल बॉटम आता सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच आता अक्षयचे चाहते थिएटरच्या माध्यमातून चित्रपटावर प्रचंड प्रेम करतील. या चित्रपटात अक्षय कुमार एका नवीन अवतारात दिसणार आहे.

80 च्या दशकातील एक कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. त्यात प्रमुख अभिनेता म्हणून अक्षय कुमार दिसणार आहे. ही एक पिरियड मुव्ही आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट आणि त्याचा ट्रेलर चर्चेचा विषय होता. या चित्रपटात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सिनेमाबद्दल सांगायचे झाल्यास कोरोना व्हायरस दरम्यान योग्य काळजी घेत सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले. तसेच सिनेमाचं संपुर्ण शुटिंग परदेशात झाले आहे. सध्या अक्षय त्याच्या आगामी सिनेमांच्या शुटिंगमध्ये देखिल कमालिचा व्यस्त आहे. रक्षा बंधन, बच्चन पांडे, सुर्यवंशम सारखे सिनेमांमध्ये देखिल अक्षय कुमार झळकणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.