एनडीए कडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. भाजप(BJP) अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर द्रौपदी मुर्मू खूप चर्चेत आल्या होत्या. सध्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या गावाची चर्चा होत आहे.(The village of Murmu, the future president, still has no electricity)
द्रौपदी मुर्मू यांचे गाव आजही अंधारात असल्याची माहिती मिळत आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा हे द्रौपदी मुर्मू यांचे गाव आहे. या गावात दोन वस्त्या आहेत. या वस्त्यांची नावे बादशाही आणि डुंगरीशाही अशी आहेत. यामधील बादशाही वस्तीमध्ये वीज आहे. पण डुंगरीशाही वस्तीमध्ये अद्याप वीज नाही.
डुंगरीशाही वस्तीमधील लोक रात्री प्रकाशासाठी रॉकेलच्या दिव्याच्या वापर करतात. या वस्तीमधील लोकांना मोबाईल चार्ज करण्यासाठी १ किलोमीटर दूर जावे लागते. द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी नाव जाहीर झाल्यानंतर माध्यमांनी त्यांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी या गावात वीज नसल्याचे समोर आले.
माध्यमांनी या विरोधात उठविल्यानंतर ओडिशा सरकारने या गावात वीज पोहोचवण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. या भागात भागात विद्युत खांब आणि ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम राज्य सरकारने युद्धपातळीवर सुरू केले आहे. गावातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात यापूर्वी वीज नव्हती.
द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार होण्यापूर्वीच गावातील स्थानिक लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. पण प्रशासनाकडून कोणतेही काम करण्यात आले नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. पण द्रौपदी मुर्मू यांचे नाव चर्चेत आल्यानंतर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर वीज पोहोचवण्याचे काम सुरु झाले आहे.
लवकरच गावात वीज दाखल होईल, अशी माहिती गावातील रहिवाशांनी दिली आहे. गावात इतरही विकासकामे करण्यात येत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी गावकऱ्यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा अभिमान असल्याचे सांगितले. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे कुटूंबीय सध्या या गावात राहत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
संजय राऊतांनी केलं चक्क नारायण राणेंचं कौतुक, म्हणाले, ‘त्या गोष्टीत मी राणेंना मानतो’
एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेले २० ते २५ आमदार शिंदेंवर नाराज, धक्कादायक कारण आले समोर
महाराष्ट्र्राच्या राजकीय नाट्यात केंद्राची एंट्री, बंडखोर आमदारांना पुरविणार ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा