Share

गावात शाळा, रुग्णालय नाही, पण दोन हेलिपॅड; एकनाथ शिंदेंच्या दरे गावाची चर्चा

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष ८ आमदार आहेत. यामुळे शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(The village has no school, no hospital, but two helipads; Discussion of Eknath Shinde’s Dare village)

त्यामुळे शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे चर्चेत आले आहेत. एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दरे या गावचे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गावातील रहिवाशांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. दरे हे गाव फार लहान आहे. हे गाव कोयना नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. या गावात सध्या फक्त ३० कुटूंब राहत आहेत.

या गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. या गावातील बहुतेकजण कामाच्या निमित्ताने मुंबई, पुणे या ठिकाणी राहत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी कामाच्या निमित्ताने ठाण्याला आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे फार लहान होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे कुटूंब ठाण्यातच स्थायिक झाले. काही दिवसांपूर्वी गावातील जत्रेच्या निमित्ताने एकनाथ शिंदे संपूर्ण कुटूंबासह दरे या आपल्या गावी आले होते.

दरे गावात शाळा, हॉस्पिटल अशा सुविधा नाही आहेत. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी तापोळा या गावात जावे लागते. दरे आणि तापोळा गावातील अंतर ५० किमी आहे. पण बोटीने हा प्रवास अवघा १० किमीचा आहे. या गावातील रहिवाशी सहसा बोटीनेच प्रवास करतात. महत्वाची बाब म्हणजे, या गावात दोन हेलिपॅड देखील आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. दरे गावच्या सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे मागील काही काळापासून गावातील विकास कामांमध्ये लक्ष देत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नावावर दरे गावात १२.४५ एकर शेतजमीन आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे गावात घर देखील आहे.

एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदार संघाचे आमदार आहेत. २००४ सालापासून सलग ४ वेळा एकनाथ शिंदे या मतदार संघातून निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे शिवसेनेचे गटनेते देखील होते. पण नुकतंच शिवसेनेकडून त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
गुवाहाटीतून ४० आमदारांचे मृतदेह येतील; संजय राऊतांच्या वक्तव्याने उडाली खळबळ
शिंदे गटातच सुरू झालाय अंतर्गत वाद, लवकरच परतीच्या वाटेवर निघणार सगळे बंडखोर
ठाकरे सरकार कोसळणार! चंद्रकांतदादांनी दिले सत्तास्थापनेचे स्पष्ट संकेत; वाचा काय म्हणाले?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now