पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य सरकाराला इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला दिला होता. यावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राने राज्याला जीएसटी थकबाकीची रक्कम दिली नसल्याचा आरोप केला होता. केंद्राने राज्याचे जीएसटी थकबाकीचे २६ हजार ५०० कोटी रुपये द्यावेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.(The Union Minister criticize cm uddhav Thackeray)
या सर्व प्रकरणावरून केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड(Bhagavat Karad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे. राज्याचे केंद्राकडे पैसे बाकी नसून केंद्राचेच राज्य सरकारकडे पैसे बाकी आहेत, असा आरोप केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केला आहे. परभणीतील एका कार्यक्रमात बोलत असताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी हे विधान केलं आहे.
परभणीमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात भाषण देखील केले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमीच आमचे इतके पैसे शिल्लक आहेत, असे म्हणत केंद्राकडे बोट दाखवतात. पण राज्याचे केंद्राकडे पैसे बाकी नसून केंद्राचेच राज्य सरकारकडे पैसे बाकी आहेत”, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आपल्या भाषणात सांगितले. या कार्यक्रमाला भाजप आमदार बबनराव लोणीकर देखील उपस्थित होते.
कृषी महोत्सवाच्या या कार्यक्रमात भाषण करत असताना भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे. सध्या या सरकारकडून योजना बंद केल्या जात आहेत”, असा आरोप भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपये देणारे फडणवीस सरकार हे स्वातंत्र्यानंतरचे पहिलेच सरकार आहे, असा दावा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भाषणात केला आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या :-
काल ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले, ‘तो’ आज जिवंत घर परतला; घटनेची परिसरात चर्चा
‘बॉम्ब’ने अख्ख जालना शहरच उडवून देणार; इसिसच्या धमकीने राज्यात खळबळ
लग्नाच्या वरातीत डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यू; पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून डॉक्टर हदारले