Share

Manikrao Kokate : CID, CBI नव्हे तर इंटरपोल चौकशी करा, माणिकराव कोकाटे पत्ते खेळत होते हेच सत्य; रोहित पवारांचा कोकाटेंवर घणाघात

Manikrao Kokate :  महाराष्ट्र विधानसभा कार्यवाही सुरू असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) मोबाईलवर पत्ते खेळताना दिसल्याचा व्हिडीओ विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी समाजमाध्यमांवर शेअर करताच राज्यात राजकीय खळबळ माजली आहे.

यासंदर्भात रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरही सवाल उपस्थित केला आहे. “सीआयडी, सीबीआय नव्हे, इंटरपोललाही चौकशी दिली तरी कोकाटे यांनी पत्तेच खेळले होते, हे सत्य बदलणार नाही,” असे रोहित पवार यांनी म्हटले.

सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, ते पत्ते खेळत नव्हते, तर यूट्यूबवर चालू असलेले विधानसभेचे थेट प्रक्षेपण पाहताना आलेली जाहिरात स्किप करत होते. मात्र व्हिडीओमध्ये स्पष्टपणे मोबाईलवर पत्त्यांचा खेळ सुरू असल्याचे दिसते.

रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “राजकीय अपरिहार्यता असावीच, पण ती इतकीही असू नये की जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल. सभागृहात महत्त्वाची चर्चा सुरू असताना कृषीमंत्री मात्र पत्त्यांत गुंतले होते. त्यामुळे त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा.”

त्यांनी पुढे म्हटले की, “अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची राजकीय गरज असू शकते, पण लोकशाहीची प्रतिष्ठा आणि शेतकऱ्यांचा अपमान यापेक्षा अधिक मोठा नाही.”

कृषीखात्याची जबाबदारी अर्थमंत्र्यांकडे?

रोहित पवार यांनी प्रस्ताव ठेवला की, सध्याच्या परिस्थितीत कृषी खात्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशील आणि सक्षम मंत्र्यांकडे असावी. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःकडेच कृषीखातंही घेण्याची आवश्यकता आहे.

कोकाटे यांचं खातं बदलणार?

मिळालेल्या माहितीप्रमाणे, सरकार आता माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या कृषी खात्याबाबत पुनर्विचार करत आहे. विरोधकांचा दबाव आणि व्हिडीओमुळे निर्माण झालेला वाद लक्षात घेता, येत्या काही दिवसांत कोकाटे यांचे खाते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now