मयूरमुळेच माझा एकमेव आधार जिवंत राहिला, अंध मातेनं सांगितला थरारक अनुभव; पहा व्हिडीओ

बदलापुरमधील वांगणी रेल्वे स्थानकावर मयुर शेळके या रेल्वे कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावत एका चिमुकल्याचा जीव वाचवला आहे. सोशल मिडियावर मयुर यांच्या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांचे कौतूक केले आहे.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत मयुर शेळके यांच्या धाडसाला सलाम असं म्हटलं आहे. तर केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनीही मयुरचे कौतूक केले आहे. मुंबईतील वांगणी रेल्वे स्थानकातील मयुर शेळकेचा अभिमान वाटतो. त्याने हिंमत दाखवत एका मुलाचे प्राण वाचवले आहेत.

त्यांच्या या शौर्याची आणि कामाची कोणत्याही कोणत्याही पुरस्काराशी किंवा पैशाशी तुलना केली जाऊ शकत नाही. परंतू आपले कर्तव्य पार पाडणं आणि आपल्या कामाबद्दल मानवतेबद्दल प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचा नक्कीच गौरव केला जाईल असं गोयल म्हणाले आहेत.

तसेच ज्या अंध महिलेच्या मुलाचा मयुर यांनी जीव वाचवला आहे. त्यांनीही शेळके यांचं कौतूक केलं आहे. आमचं हातावरच पोट असल्यानं काम करणं जरुरी असतं. त्यासाठीच मी प्लॅटफॉर्मवर चालत होते, मात्र चालता-चालता माझा मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडला, त्यावेळी त्याला बाहेर काढायला कुणीही नव्हतं.

तितक्यात एक्सप्रेस गाडी आली होती. पण झेंडेवाल्या मयूर शेळकेनं स्वत:चा जीव धोक्यात घालून आमच्या मुलाचा जीव वाचवला. माझा एकमेव आधार मयूरमुळेच जिवंत राहिला. त्यामुळे, मयूरला पुरस्कार द्यावा, अशी मागणी चिमुकल्याची अंध माता संगिता शिरसाठ यांनी केली आहे.

नेमकं काय घडलं होतं…

रेल्वे स्थानकावर एक महिला आपल्या छोट्या मुलाला घेऊन रेल्व ट्रॅकच्या कडेने चालली होती. तेवढ्यात मुलगा रेल्वे रुळावर पडतो. महिलेला डोळ्यांनी दिसत नव्हते. मुलाला वाचवण्यासाठी ती मोठमोठ्याने ओरडत होती.

मुलगा सुध्दा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. तेवढ्यात भरधाव वेगात रेल्वे आली. त्या ठिकाणी  कर्तव्य बजावत असलेले कर्मचारी मयुर शेळके यांना मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडला असल्याचं दिसलं आणि त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी जोरात धाव घेतली आणि त्या मुलाचा जीव वाचवला.

महत्वाच्या बातम्या-
रेल्वे रुळावर चिमुकला तोल जाऊन पडला; रेल्वे कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावत वाचवले प्राण, पाहा व्हिडिओ
कोरोना लस घेण्यााठी भारतातील श्रीमंत लोक जात आहेत परदेशात; प्रत्येक व्यक्तीचा खर्च ५५ लाख
अभिनेते ज्युनियर मेहमूदने राजेश खन्नाबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाले ते तर…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.