कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा IPL चा तेरावा हंगाम भारताबाहेर होणार!

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रीडा महोत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे इंडियन प्रिमीयर लीग म्हणजेच IPL स्थगित केली होती.

कोरोनामुळे यंदा आयपीलची स्पर्धा रद्द करण्याबाबतही चर्चा सुरु होती. मात्र IPL रद्द केल्यास BCCI ला ४ हजार कोटींचे नुकसान होणार आहे. यासाठी वर्षाअखेरीस या स्पर्धेचं आयोजन करण्याची तयारी BCCI ने केली आहे.

मात्र आयपीएलचा १३ वा हंगाम भारताबाहेर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु IPL कुठे होणार याबाबत आजूनही निर्णय घेतलेला नाही. मात्र हा हंगाम भारताबाहेर आयोजित केला जाईल असे सांगण्यात आले आहे.

सध्यातरी दुबई आणि श्रीलंका यांच्यात आयोजनाचा विचार सुरु आहे. त्यामुळे फक्त साखळी सामने परदेशात भरवले जाणार आहेत.

त्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन स्पर्धा भारतात हलण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती BCCI च्या अधिकाऱ्याने दिली आहे.

टी-२० वर्ल्ड कपच्या आयोजनानंतर BCCI ला IPLबाबत ठोस निर्णय घेता येणारे. श्रीलंका आणि दुबई क्रिकेट बोर्डाने BCCI ला IPLचा तेरावा हंगाम आपल्या देशात भरवण्याचा प्रस्ताव दिला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.