मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांनी अखेर माघार घेतली आहे. आक्रमक शिवसैनिकांसमोर अखेर राणा दाम्पत्य नरमले आहे. पंतप्रधान मोदींच्या(PM Modi) मुंबई दौऱ्यात विघ्न नको, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी माघार घेतली आहे. यानंतर राज्य सरकारने राणा दाम्पत्यांना अमरावतीला पोहचवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.(The Thackeray government will send the Rana couple to Amravati at the government’s expense)
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी शुक्रवारी पहाटे मुंबईत दाखल झाले होते. राणा दाम्पत्याचा विरोध करण्यासाठी शिवसैनिक कालपासून त्यांच्या खार येथील घरासमोर ठाण मांडून बसले होते. त्यांना डिवचण्यासाठी शिवसैनिकांनी रूग्णवाहीकाही आणली होती. अगदी 92 वर्षांच्या आज्जी देखील पहारा देण्यासाठी मातोश्रीवर आल्या होत्या.
शिवसैनिक राणांना हनुमान चालिसा वाचण्यासाठी मातोश्रीवर येण्याचे चॅलेंज देत होते. अखेर आक्रमक शिवसैनिकांपुढे राणा दाम्पत्याने माघार घेतली आहे. राणा दाम्पत्याला सुखरूप अमरावतीला पोहचवण्याची गृह खात्याची जबाबदारी असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संवाद यात्रेचा दौरा अर्धवट सोडला असून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गृहमंत्री स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. सध्या राणा दाम्पत्याला त्यांच्या खार येथील घरत नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. तसेच काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षेसाठी घराजवळ तैनात करण्यात आले आहेत. खासदार नवनीत राणा घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या.
त्यावेळी पोलिसांनी नवनीत राणा यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण खासदार नवनीत राणा घराबाहेर पडण्याच्या भूमिकेवर ठाम होत्या, म्हणून पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी राणा दाम्पत्याच्या घराजवळ प्रचंड संख्येने शिवसैनिक जमले होते. यावेळी शिवसैनिक राणा दाम्पत्यांविरोधात घोषणा देखील देत होते.
यावेळी काही आक्रमक पवित्रा घेत पोलिसांनी उभारलेले बॅरीगेट हटवले आणि राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. सुमारे २५० ते ३०० शिवसैनिक पोलिसांचा वेढा तोडत बॅरीगेटवर चढले. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन देखील केले.
महत्वाच्या बातम्या :-
राणा दाम्पत्याला घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, वळसे पाटलांवर दिली जबाबदारी
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन देणारा मनोज वायपेयींचा हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहिलात का? व्हाल भावूक
‘चला घराच्या बाहेर निघा’ संतापलेल्या नवनीत राणा थेट पोलिसांनाच धमकावू लागल्या; पहा व्हिडिओ