“ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा ठरवून खून केला”

मुंबई | संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाबद्दल सुप्रिम कोर्टाने आज निकाल जाहीर झाला आहे. यावेळी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील भाजपमधील नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकरावर सडकून टीका केली आहे. राणे यांनी ट्विट करत म्हटले की, या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणचा नियोजित पध्दतीने खून केला आहे.

सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे. कसली तयारी नाही. फक्त नाटक आणि ढोंगीपणा.. शेवटी छ. शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे…तोंड वाजवून न्याय भेटत नसेल..तर तोंडात वाजवून न्याय मिळवा!! असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १६% आरक्षण दिले होते. यावर सर्वाेच्च न्यायालयात गेल्या अनेक महिन्यांपासून तारखावर तारखा देण्यात येत होत्या. अखेर  आज यावर निकाल देण्यात आला.  यावर आता मराठा समाज काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यावर खासदार संभाजीराजे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी फडणवीस सरकारप्रमाणेच ठाकरे सरकारनेही सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजेंनी सुचवला ‘हा’ नामी उपाय
निवडणुकीनंतर पंढरपूरात कोरोनाचा उद्रेक; ऑक्सिजनच्या तुटवड्याने रुग्ण अक्षरश तडफडताहेत
‘या’ झाडाच्या देखभालीचा खर्च आहे १५ लाख; झाडाभोवती असतो २४ तास कडक पहारा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.