चक्क शिक्षकच करत होता कोरोना रूग्णांवर उपचार; पोलीसांनी केली अटक

लखनऊ | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

देशात कोरोनाची लाट आल्यापासून आरोग्य कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, नर्स  जीवाची बाजी लावून रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. मात्र रुग्णांच्या असाहय्यतेचा अनेक जणांनी गैरफायदा घेतला आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन, औषधं, ऑक्सिजन यांचा काळाबाजार केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच उपचाराच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांकडून लाखो रुपये उकळल्याचे प्रकार समोर आले आहेत. दिवसेंदिवस अशा घटना घडत आहेत.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही एक अशीच घटना घडली आहे. लखनऊच्या चिनहट क्षेत्रातील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. स्वत: डॉक्टर असल्याचं सांगून करोना रुग्णांवर उपचार करत होता. शशिवेंद्र पटेल (वय ४५) असं त्या शिक्षकाटं नाव आहे. तो कंचनपुर मटियारी परिसरात राहतो.

शशिवेंद्र पटेल हा लोकांना कोर मेडिक्स इंडियाचा व्यवस्थापक, आरोग्य अधिकारी, डॉक्टर असल्याचं भासवत होता. तसेच आपल्याकडे तज्ञ डॉक्टरांची टीम असल्याचंही लोकांना सांगत होता.  लोकांकडून शशिवेद्र उपचाराच्या नावाखाली पैसे वसूल करत होता.

एका महिलेची शशिवेंद्र पटेलने अशीच फसवणूक केली होती. तिच्या पतीला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचार न करता त्याने दीड लाख रुपये उकळले होते. उपचाराअभावी महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात  येताच महिलेने चिनहट पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

पोलिस अधिकारी धनंजय पांडे यांनी  तपासाला सुरूवात केली. यानंतर पोलिसांनी  शिक्षक शशिवेंद्रचे कारनामे समोर आणले. शशिवेंद्र हा घरीच कोरोना रुग्णांवर उपचार करत होता. पीडीत महिलेच्या पतीला ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या नावाखाली महिलेकडून पैसे उकळले होते. महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतरही पैसे मागत होता.

या संपुर्ण प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी शिक्षक शशिवेंद्रला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान देशात कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं चित्र दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासात २ लाख ७६ हजार ७० नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात ३ हजार ८७४ रुग्णांनी जीव गमावले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
अभ्यासू व्यक्तीमत्व, छत्रपतींचे वंशज, आक्रमक शैली, वाचा मराठ्यांच्या ढाण्या वाघाबद्दल..
सर्वांचा फेव्हरेट असणारा ‘हा’ दिग्गज खेळाडू होणार टिम इंडीयाचा नवीन कोच
कोरोनाग्रस्त आईला मुलगा व सून रुग्णालयात सोडून गेले; नर्सने आईसारखे सांभाळले आणि..
कोरोनाच्या लसीची कमाल! १० वर्षांपासून असलेला आजार कोरोना लसीमुळे बरा; शिक्षकाचा अजब दावा

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.